WTC Points Table: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (१९ फेब्रुवारी) चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून शानदार विजय नोंदवला. भारतीय संघाने तीन दिवसांत सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडिया आता फायनलमध्ये पोहोचण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसोटी पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर, भारत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचे ६६.६७ टक्के गुण आहेत. तर भारताला ६४.०६ टक्के गुण मिळाले आहेत. नागपूर कसोटीत भारताला ६१.६७ टक्के गुण मिळाले होते. या बाबतीत श्रीलंका (५३.३३) सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका (४८.७२) आणि इंग्लंड (४६.९७) पाचव्या स्थानावर आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ यापूर्वीच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, जेतेपदाच्या लढतीत त्याच्यापुढे दुसरा संघ कोण असेल, हे अद्याप अधिकृतपणे ठरलेले नाही. मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी भारताला खेळणे निश्चित आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्याला उर्वरित दोन सामने अनिर्णित ठेवावे लागतील. अशा स्थितीत भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

तिसरी कसोटी इंदोरमध्ये होणार आहे

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा कसोटी सामना १ ते ५ मार्च दरम्यान इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा त्या मैदानावर कसोटीत १०० टक्के विजयाचा विक्रम आहे. येथे खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंड आणि बांगलादेशचा पराभव केला. अशा स्थितीत इंदोरमध्ये विजयाची नोंद करून भारतीय संघ सलग दुस-यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिकीट मिळवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs AUS: “त्याने मलाही खायला लावले पण…”, फिटनेस उत्साही कोहली खरेच खात होता छोले भटुरे? राहुल द्रविडचा रहस्यभेद!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर कसा पोहोचेल?

  • जर टीम इंडियाने मालिका २-० ने जिंकली (भारताने दोन सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले)
  • जर टीम इंडियाने मालिका ३-१ ने जिंकली (भारताने तीन सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाने एक)
  • जर टीम इंडियाने मालिका ४-० ने जिंकली (भारताने सर्व चार सामने जिंकले)
  • जर टीम इंडियाने मालिका ३-० ने जिंकली (भारताने तीन सामने जिंकले आणि एक अनिर्णित राहिला)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc team india wtc equation changed after delhi test win on whose head hangs the sword the icc itself gave the answer avw