जॉन सीना हे WWE मधील एक मोठे नाव आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. शिवाय त्याचे भारतातील लोकांवर खूप प्रेम आहे. यावेळी त्याने प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार सिद्धार्थ शुक्लाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सिद्धार्थचे वयाच्या ४०व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थच्या अचानक एक्झिटनंतर सीनाने त्याचा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
जॉन सीना नेहमीच सोशल मीडियावर कॅप्शनशिवाय फोटो अपलोड करतो. त्याने भारतातील अनेक सेलिब्रिटींचे फोटो अनेक वेळा पोस्ट केले. जॉन सीना एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर जुलैमध्ये WWE रिंगमध्ये परतला. त्यानंतर सीनाने रोमन रेन्सला युनिव्हर्सल चॅम्पियनशिपसाठी आव्हान दिले. डब्ल्यूडब्ल्यूई समरस्लॅम २०२१च्या मुख्य कार्यक्रमामध्ये सीना आणि रेन्सयांच्यात जबरदस्त सामना झाला. जॉन सीना या सामन्यात हरला आणि रेन्सने त्याच्या जेतेपदाचा बचाव केला. यानंतर सीना रिंगमध्ये दिसली नाही.
View this post on Instagram
१० सप्टेंबर रोजी MSG येथे होणाऱ्या ब्लू ब्रँडच्या भागामध्ये सीना शेवटच्या वेळी दिसणार आहे. यानंतर, तो कदाचित त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाईल. सीना पुढच्या वेळी कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा – ENG vs IND : मैदानात वारंवार घुसखोरी करणं ‘त्या’ भारतीय चाहत्याला पडलं महागात; पोलिसांनी त्याला…
अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर काल मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. १९८० साली मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. २००८ मध्ये ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या मालिके पासून छोट्या पडद्यावर त्याचे पदार्पण झाले. त्यानंतर ‘जाने पेहचाने से ये अजनबी’, ‘आहट’ आणि ‘सीआयडी’ मालिके चे काही भाग तसेच ‘लव्ह यू जिंदगी’सारख्या मालिकांमधून त्याने काम के ले. २०१२ साली कलर्स वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘बालिका वधू’ मालिकेतील शिवच्या भूमिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण के ले होते. सिद्धार्थचे रुपेरी पडद्यावरील पदार्पण फारसे यशस्वी ठरले नसले तरी छोट्या पडद्यावरची त्याची लोकप्रियता कायम अबाधित राहिली.