प्रतिस्पर्ध्याला गुंतवून टाकणारे डावपेच आणि आपल्या पिळदार देहयष्टीने समोरच्याला घाम फोडणारा दिग्गज कुस्तीपटू स्कॉट हॉलचे वयाच्या ६३ व्या वर्षी दुखद निधन झाले. मागील काही दिवसांपूर्वी खाली कोसळल्यामुळे त्याच्या कंबरेला इजा झाली होती. त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच स्कॉट हॉलची प्राणज्योत मालवली.

१२ मार्च रोजी स्कॉट हॉलवर शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र स्कॉटला हृदयविकाराचे तीन झटके आले. त्यानंतर डॉक्टरांनी स्कॉटला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. शेवटी उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे स्कॉटचे निधन झाले.

Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
spinner r ashwin confident about successful performance in border gavaskar series
स्मिथचा बचाव भेदण्यासाठी सज्ज! आगामी मालिकेत यशस्वी कामगिरीचा अनुभवी फिरकीपटू अश्विनला विश्वास
article pay tribute to world renowned mridangam scholar varadarao kamalakara rao
व्यक्तिवेध : व्ही. कमलाकर राव
star pravah this marathi actor enters marathi serial subhavivah
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री! पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या भूमिकेचं नाव, म्हणाला…
IND vs AUS Tim Paine impressed with Dhruv Jurel
IND vs AUS : ‘तो फक्त २३ वर्षांचा आहे, पण…’, टिम पेन भारताच्या युवा खेळाडूच्या फलंदाजीने प्रभावित; म्हणाला, ‘तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांना…’
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य

स्कॉटने १९९० मध्ये WWE मध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याआधी स्कॉटने NWA, AWA, WCW कुस्ती स्पर्धेत भाग घेतलेला होता. स्कॉटने सुरुवातीला डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये फक्त एका वर्षासाठी कुस्ती खेळली होती. त्यानंतर तो जपान प्रो रेस्टलिंग आणि कॅच रेस्टलिंग असोशिएशनमध्ये कुस्ती खेळण्यासाठी गेला. हा काळ त्याने चांगलाच गाजवला.

त्यानंतर १९९२ मध्ये तो पुन्हा एखदा WWE मध्ये कुस्ती खेळण्यासाठी परतला. आपल्या दुसऱ्या पदार्पणात त्याने चांगलीच कामगिरी करुन तब्बल चार वेळा इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियन होण्याची किमया करुन दाखवली. कुस्तीच्या विश्वात स्कॉटला रेझर रॅमन म्हणूनदेखील ओळखले जाते.

रेसलमेनिया १० मध्ये स्कॉट आणि शॉन मायकल यांच्यात रोमहर्षक सामना झाला होता. या सामन्यात स्कॉटने शॉनला हरवले होते. हा सामना रेसलमेनियामधील वर्षभरातील सर्वात सर्वोत्कृष्ट सामना म्हणून घोषित करण्यात आला होता. स्कॉट हॉलने WWC युनिव्हर्सल हेवीवेट चॅम्पियनशिप आणि USWA युनिफाइड वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपसह दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावलेले आहे.