Yash Dhull said Virat Bhaiya & I share a special bond: एसीसी इमर्जिंग आशिया कप २०२३ मध्ये टीम इंडियाने यूएईचा ८ गडी राखून पराभव केला. दोन्ही संघांमध्ये गेल्या शनिवारी सामना खेळला गेला, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना यूएईने केवळ १७५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला १७६ धावांचे लक्ष मिळाले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने कर्णधार यश धुलच्या नाबाद १०८ धावांच्या जोरावर विजय मिळवला. त्याचवेळी यशने सामन्यानंतर स्टार खेळाडू विराट कोहलीबाबत एक वक्तव्य केले.
विराट कोहलीबद्दल यश धुल काय म्हणाला?
विजयानंतर यश धुल स्टार स्पोर्टशी बोलताना म्हणाला की, “विराट कोहलीसोबतचे माझे बॉन्डिंग अप्रतिम आहे. विराट भैय्यासोबत एक खास बाँडिंग आहे. विराट कोहलीकडून मला खूप काही शिकायला मिळाले. विशेषतः विराट कोहलीचा आक्रमक स्वभाव मला आवडतो.”
कर्णधार यश धुल पुढे म्हणाला, “विराट कोहली जेव्हा फलंदाजी करत असतो, त्यावेळी विराट कोहलीची मानसिकता ज्या प्रकारे असते, ते कौतुकास्पद आहे. विराट कोहलीकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळते.” मात्र, यश धुलचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला कर्णधार यश धुल. यश धुलने ८४ चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना यएईने ५० षटकात ९ गडी गमावून १७५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २६.३ षटकात २ बाद १७९ धावा करत सामना जिंकला. मात्र, या
यश धुलची कारकीर्द –
यश धुलच्या कारकिर्दीकडे पाहता, आतापर्यंत या खेळाडूने भारतीय अंडर-19 संघाव्यतिरिक्त उत्तर विभाग, शेष भारत आणि भारत-अ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. मात्र, आतापर्यंत यश धुलने आयपीएलमध्ये केवळ चार सामने खेळले आहेत. धुलने या चार सामन्यात १६ धावा केल्या आहेत. मात्र, यश धुलने १९ वर्षांखालील स्तरावर आपली चांगलीच छाप पाडली आहे.