Yashasvi Jaiswal and Ishan Kishan made their debuts for India: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे खेळाडू प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरतील. भारताने या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यशस्वी जैस्वाल आणि इशान किशनचा समावेश केला आहे. यशस्वी आणि ईशान पदार्पण कसोटी सामना खेळणार आहेत. टीम इंडियाने अजिंक्य रहाणेलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे.
यशस्वी जैस्वालची कामगिरी –
यशस्वी देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी पदार्पणाची बातमी शेअर केली. यशस्वीने आतापर्यंत २६ प्रथम श्रेणी डावांमध्ये १८४५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ९ शतके आणि २ अर्धशतके झळकावली. यशस्वीने ३२ लिस्ट ए सामन्यात १५११ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके केली आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये त्याने चांगली कामगिरी केली. याच कारणामुळे यशस्वीला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले. आता तो पदार्पणाचा सामनाही खेळणार आहे.
इशान किशनची कामगिरी –
इशान भारताकडून वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६५३ धावा केल्या आहेत. त्याने १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१० धावा केल्या आहेत. आता कसोटी सामन्यात पदार्पण करणार आहे. इशानने ८२ प्रथम श्रेणी डावात २९८५ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने लिस्ट ए च्या ८७ डावात ३०५९ धावा केल्या आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन