Yashasvi Jaiswal and Shubman Gill’s partnership record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉडरहिल येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ९ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीने इतिहास रचला आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीची सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी बनले आहेत. याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवला गेला होता. या सलामीच्या जोडीने शानदारी फलंदाजी करताना २०२१ मध्ये पहिल्या विकेट्ससाठी १५८ धावांची भागीदारी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नाही तर यशस्वी आणि गिल ही युवा जोडी देशासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये पहिल्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. त्याचबरोबर त्यांनी केएल राहुल आणि रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी साधली. यशस्वी आणि गिलच्या आधी हा विक्रम रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या नावावर होता. २०१७ मध्ये, श्रीलंकेविरुद्ध रोहित आणि राहुल जोडीने पहिल्या विकेटसाठी १६५ धावा जोडल्या होत्या.

यशस्वी आणि गिल यांनी लॉडरहिलमध्ये केला धमाका –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात यशस्वी आणि गिलने बॅटने जोरदार फटकेबाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी लॉडरहिलमधील सर्व कॅरेबियन गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. त्याचबरोबर शुबमन गिलने ४७ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ४ षटकार मारत ७७ धावा केल्या. यादरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी १५.३ षटकात १६५ धावांची शतकी भागीदारी झाली.

हेही वाचा – IND vs WI 4th T20: अर्शदीप सिंगचा मोठा पराक्रम, भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा गोलंदाज

भारताने १८ चेंडू आणि ९ गडी राखून जिंकला चौथा सामना –

लॉडरहिल येथे खेळला गेलेला चौथा टी-२० सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ असा होता. पण टीम इंडियाने येथे चांगली कामगिरी करत १८ चेंडू आणि नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात विरोधी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून १७८ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal and shubman gill broke the record of babar rizwan duo in ind vs wi 4th t20 vbm