Yashasvi Jaiswal became1st Indian batter to score 1000 Test runs in a calendar year 2024 : टीम इंडियाच्या युवा खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल हा सर्वात सक्षम फलंदाज मानला जातो. जे त्यांनी अनेकदा सिद्धही केले आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत जैयस्वालला अद्यापही मोठी खेळी साकारता आलेली नाही. असे असतताना पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३० धावांची खेळी साकारत मोठा पराक्रम केला आहे. वयाच्या २३ वर्षापूर्वी एका कॅलेंडर वर्षात १,००० कसोटी धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने २०२४ मध्ये एक नवीन टप्पा गाठला आहे. मात्र, एबी डिव्हिलियर्स आणि ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडण्यात तो थोडक्यात चुकला.

यावर्षी जैस्वालने कसोटीत १,००० हून अधिक धावा केल्या –

यशस्वी जैस्वालने यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याला एबी डिव्हिलियर्स आणि ॲलिस्टर कूकला मागे टाकण्याची संधी होती. वयाची २३ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात १००० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे, तर त्यात जैस्वालचे नावही जोडले गेले आहे. त्याचबरोबर एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत गॅरी सोबर्सचं नाव आघाडीवर आहे. हे काम त्यांनी १९५८ साली केले आहे.

Virat Kohli Tim Southee Fighting Video Goes Viral in India New Zealand 2nd Test Pune Watch
IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Chhagan Bhujbal On Sameer Bhujbal
Chhagan Bhujbal : “राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच”, छगन भुजबळांची समीर भुजबळांवर टीका; अजित पवारांचंही दिलं उदाहरण
Election Commission of India holds a press conference in Delhi. Dates for Assembly elections in Jharkhand and Maharashtra
Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा

एबी डिव्हिलियर्स आणि ॲलिस्टर कुकचा विक्रम थोडक्यात हुकला –

२००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीन स्मिथने हा पराक्रम केला होता. तेव्हा त्याचे वय २३ वर्ष पूर्ण नसताना एका कॅलेंडर वर्षात १००० हून अधिक कसोटी धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याच्या नावावर ११९८ धावा होत्या. २००५ साली दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने १००८ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या ॲलिस्टर कुकने २००६ मध्ये १०१३ धावा केल्या होत्या. आता जैस्वालही या यादीत सामील झाला आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात या दोन दिग्गजाना मागे टाकण्याची संधी आहे.

हेही वाचा – ‘विराट कोहलीने आता लंडनमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलंय…’, फ्लॉप शोमुळे चाहते संतापले, मीम्स व्हायरल

वयाच्या २३ वर्षांपूर्वी एका कॅलेंडर वर्षात १००० हून अधिक कसोटी धावा करणारे खेळाडू :

गारफिल्ड सोबर्स (१९५८): ११९३ धावा
ग्रॅमी स्मिथ (२००३): ११९८ धावा
एबी डिव्हिलियर्स (२००५): १००८ धावा
ॲलिस्टर कुक (२००६): १०१३ धावा
यशस्वी जैस्वाल (२०२४): १००३ धावा

हेही वाचा – विराट कोहलीला फुलटॉस बॉलवर आडवा शॉट मारणे पडले महागात, मिचेल सँटनरने उडवला त्रिफळा, पाहा VIDEO

भारताचा पहिला डाव १५६ धावांवरच आटोपला –

भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. भारतीय संघ केवळ ४५.३ षटकेच खेळू शकला. रोहित शर्मा गुरुवारीच खाते न उघडताच बाद झाला. शुक्रवारी भारताला पहिला झटका शुबमन गिलच्या रूपाने बसला. तो ३० धावा करून बाद झाला. त्याचवेळी विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि एक धाव काढून पॅव्हेलियन परतला. ऋषभ पंत (१८), सर्फराझ खान (११) आर अश्विन (४), आकाश दीप (६) आणि बुमराह खाते न उघडता बाद झाला. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३८ धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदर १८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. ज्यामुळे पहिल्या डावात २५९ केल्यांनतर १०३ धावांची आघाडी घेतली.