Yashasvi Jaiswal after Century emotional: २१ वर्षीय यशस्वी जैस्वाल भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या यशस्वीने संथ खेळपट्टीवर २१५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यूपीच्या भदोही येथे जन्मलेला यशस्वी तरुण वयात मुंबईत आला. येथूनच त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आणि आज तो टीम इंडियाचा एक भाग झाला आहे.

शतक झळकावल्यानंतर यशस्वी काय म्हणाला?

वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल खूप भावूक झाला. बीसीसीआयने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात आपल्या शतकाविषयी बोलताना यशस्वी म्हणाला, “हे शतक माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि सर्व चाहत्यांसाठी, संघातील सहकारी या सर्वांनी मला खूप साथ दिली. रोहित भाईने ज्यांनी मला मैदानात विश्वास निर्माण केला की मी मोठी खेळी करू शकतो.

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Sanju Samson Creates History With 2nd Consecutive T20I Century Becomes First Indian Batsman IND vs SA
Sanju Samson Century: संजू सॅमसनने शतकासह घडवला इतिहास, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

पुढे युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल म्हणाला की, “हा सुरु झालेला माझा प्रवास खूप लांबचा आहे. ज्यांनी मला कोणत्याही प्रकारची आतापर्यंत मदत केली त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. एवढंच मी म्हणेन की मी ज्या परिस्थितीतून आलो आहे त्यात माझ्या पालकांचा आणि गुरूंचा खूप मोठा वाटा आहे हे शतक मी त्यांना समर्पित करू इच्छितो. माझ्या आयुष्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. देव माझ्या पाठीशी आहेच त्यामुळे मला फार काही सांगायला आवडणार नाही. मी फक्त एक सुरुवात केली आहे आता पुढे देखील असेच आणखी प्रयत्न करत राहीन.”

हेही वाचा: Rohit-Yashasvi: रोहित-जैस्वालची जोडी ठरली ‘यशस्वी’! शानदार सलामी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडीज बॅकफुटवर

परदेशात पदार्पणात शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर

यशस्वी जैस्वाल कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा १७वा भारतीय फलंदाज ठरला आहे. १९३३ मध्ये लाला अमरनाथ पदार्पणात शतक झळकावणारे भारताचे पहिले फलंदाज ठरले. मात्र, आतापर्यंत भारताच्या एकाही सलामीवीराने घराबाहेर पदार्पण करताना शतक झळकावले नव्हते. अशी कामगिरी करणारा यशस्वी पहिला फलंदाज ठरला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी ३५० चेंडूत १४३ धावा करून खेळत होता. या खेळीत त्याने १४ चौकार मारले आहेत.

सहाव्यांदा भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी एकाच डावात शतक झळकावले

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये हे सहाव्यांदा घडले आहे जेव्हा दोन्ही सलामीचे फलंदाज शतक झळकावण्यात यशस्वी झाले आहेत. याआधी बांगलादेशविरुद्धच्या फतुल्ला कसोटी सामन्यात मुरली विजय आणि शिखर धवन या जोडीने भारतासाठी शेवटची कामगिरी केली होती.

कर्णधार रोहित शर्मा आपले १०वे कसोटी शतक पूर्ण करून पॅव्हेलियनमध्ये परतला

रोहित शर्मा आपले १०वे कसोटी शतक पूर्ण करून १०३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये भारताबाहेर रोहितचे हे दुसरे शतक ठरले. याआधी त्याचे परदेशातील पहिले कसोटी शतक इंग्लंडमध्ये झळकले होते.