Yashasvi Jaiswal’s second consecutive double century : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत द्विशतक झळकावले. यापूर्वी त्याने विशाखापट्टणममध्येही द्विशतक झळकावले होते. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाला होता, पण चौथ्या दिवशी तो फलंदाजीला आला आणि त्याने द्विशतक झळकावले. जैस्वालने २३१ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने द्विशतक पूर्ण केले. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. त्याच्या आधी विराट कोहली आणि विनोद कांबळीने हा पराक्रम केला आहे.
यशस्वी जैस्वालने लावली विक्रमांची रांग –
यशस्वीचे हे मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावातही हा पराक्रम केला होता. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. त्याच्या आधी विराटने २०१७-१८ मध्ये, विनोद कांबळीने १९९२-९३ मध्ये ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल भारतासाठी दुसऱ्या डावात द्विशतक झळकावणारा जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. या क्लबमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण, वसीम जाफर, मन्सूर अली पतौडी आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे.
या कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात भारताने एकूण २८ षटकार मारले, त्यापैकी यशस्वी जैस्वालने १२ षटकार मारले. २८ षटकार मारल्यानंतर टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत अनेक कसोटी विक्रम केले. भारताने या कसोटीच्या पहिल्या डावात १० तर दुसऱ्या डावात १८ षटकार मारले. यापूर्वी २००९ मध्ये मुंबईत श्रीलंकेविरुद्ध भारताने एकूण १५ षटकार मारले होते.
हेही वाचा – Mike Procter : दक्षिण आफ्रिकेच्या महान क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ७७ वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारताकडून एका डावात सर्वाधिक षटकार –
१८ विरुद्ध इंग्लंड- राजकोट, २०२४
१५ विरुद्ध श्रीलंका- मुंबई, २००९
१४ विरुद्ध श्रीलंका- विझाग, २०१९
१३ विरुद्ध श्रीलंका- विझाग, २०१९
१३ विरुद्ध दक्षिण आफ्रिका- रांची, २०१९
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! सलग दुसऱ्या सामन्यात झळकावले द्विशतक
एका कसोटीत सर्वाधिक षटकार –
राजकोट कसोटीत भारताने एकूण २८ षटकार ठोकले आणि कोणत्याही कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम ठरला. याआधी २०१९ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विझागमध्ये २७ षटकार मारले होते.
भारताकडून एका कसोटीत सर्वाधिक षटकार –
२८ विरुद्ध इंग्लंड- राजकोट, २०२४
२७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका- विझाग, २०१९
१८ विरुद्ध न्यूझीलंड- मुंबई, २०२१
१५ विरुद्ध श्रीलंका- मुंबई, २००९