India vs Bangladesh 2nd Test Highlights in Marathi: भारताने कानपूर कसोटीत बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. अडीज दिवस खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारताने उत्कृष्ट कामगिरी करत मालिकाही जिंकली. या मालिकाविजयासह भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर ऐतिहासिक विजय नोंदवला. या खेळीसह यशस्वीनेही मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.

बांगलादेशला दुसऱ्या डावात १४६ धावांवर ऑल आऊट केल्यानंतर भारताला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. फलंदाजी करताना दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने केवळ ४५ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. अशा प्रकारे भारताच्या युवा सलामीवीराने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Yashomati Thakur's allegations on Sunil Karhade of NCPSP.
Yashomati Thakur: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण

हेही वाचा – IND vs BAN: टीम इंडियाने कानपूर कसोटीत लिहिला नवा इतिहास, २१व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

यशस्वी जैस्वालने पहिल्या डावातही अप्रतिम अर्धशतक झळकावले होते. जैस्वालने ५१ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७२ धावांची शानदार खेळी केली आणि आता दुसऱ्या डावात झटपट अर्धशतक झळकावून नवा इतिहास घडवला. जैस्वाल हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात याआधी केवळ वीरेंद्र सेहवागलाच ही कामगिरी करता आली होती.

हेही वाचा – “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही…”, फलंदाजीपूर्वी संघाला कर्णधाराने नेमकं काय सांगितलं? राहुलने केला खुलासा

कसोटीच्या दोन्ही डावात १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज

५५ (४६) आणि ५५(५५) – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली, २०११
७२(५१) आणि ५१(४५) – यशस्वी जैस्वाल वि बांगलादेश, कानपूर, २०२४
यशस्वी जैस्वालने मोडला सुनील गावसकरांचा दुर्मिळ विक्रम

हेही वाचा – IND vs BAN: रोहित-अश्विनच्या सापळ्यात अडकला मोमिनुल हक, दुसऱ्या चेंडूवरचा शॉट पाहून बदलली फिल्डिंग अन् मिळाली विकेट, पाहा VIDEO

यशस्वी जैस्वालने मोडला सुनील गावसकरांचा दुर्मिळ विक्रम

यशस्वी जैस्वालच्या आता २०२४ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये ९२९ धावा आहेत, ज्या २३ वर्षीय भारतीय फलंदाजाने एका कॅलेंडर वर्षात केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यासह त्याने सुनील गावस्कर यांचा ९१८ धावांचा ५३ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ९१८ धावा केल्या होत्या.

यशस्वी जैस्वालने २०२३ मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ११ कसोटी सामन्यांच्या २० डावांमध्ये १२१७ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. जो रूट पहिल्या तर कामेंदू मेंडिस दुसऱ्या स्थानावर आहे.