Yashasvi Jaiswal break Gautam Gambhir Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळलाा जात आहे. या सामन्यात भाारतीय संघाने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत गारद झाला. त्यामुळे भारतीय संघाने ४६ धावांची आघाडी घेऊन आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. या डावात यशस्वी जैस्वालने केएल राहुलबरोबर सलामी देताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते.

भारतीय डावाच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरीही अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराहने एकट्याने कांगारू संघाच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ६७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया १०४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पहिल्या डावातील अपयशातून धडा घेत यशस्वी जैस्वालने केएल राहुलसह दुसऱ्या डावात सावध खेळी करत टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. त्याचबरोबर १५ धावा करताच नवा इतिहास लिहिला आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम –

वास्तविक यशस्वी जैस्वाल यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या वर्षी १००० हून अधिक धावा करणारा युवा सलामीवीर जो रूटनंतर जगातील दुसरा फलंदाज आहे. जैस्वालने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात १५ धावांचा टप्पा गाठताच भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा चमत्कार घडला. जैस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा डावखुरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने १६ वर्षे जुना विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम माजी भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नावावर होता. गंभीरने २००८ साली कसोटी क्रिकेटमध्ये ८ कसोटी सामन्यांच्या १६ डावात ११३४ धावा केल्या होत्या. या काळात त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली.

हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने मोडला वसीम अक्रमचा मोठा विक्रम! ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

u

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज (डावखुरे) –

यशस्वी जैस्वाल- ११३५ धावा (२०२४)
गौतम गंभीर- ११३४ धावा (२००८)

Story img Loader