Yashasvi Jaiswal broke Sachin Tendulkar’s record for highest batting average in first class cricket: गेल्या दीड वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुफान खेळी करणाऱ्या युवा डावखुऱ्या फलंदाज यशस्वी जैस्वालचे बालपणीचे स्वप्न सत्यात उतरले आहे. डॉमिनिका येथे बुधवारपासून सुरू झालेल्या विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. त्याआधी त्याला पदार्पणाची टेस्ट कॅप देण्यात आली होती. या कसोटीसह इशान किशनच्या कसोटी कारकिर्दीलाही सुरुवात झाली.

मात्र, यशस्वी जैस्वालने भारताकडून मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी उतरताच खास विक्रम करत सचिन तेंडुलकरला मागे टाकले. भारतासाठी पहिली कसोटी खेळण्यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम सरासरीचा विचार केल्यास एक विशेष विक्रम देखील आहे, या प्रकरणात माजी लेफ्टी आणि सचिनचा सहकारी विनोद कांबळी (८८.३७, २७ सामने) पहिल्या क्रमांकावर आहे. आता या यादीत जयस्वाल यांनी स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर आणले आहे.

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

तसेच, याला तुम्ही योगायोग म्हणू शकता की, या बाबतीत मुंबईचे फलंदाज पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. कांबळीनंतर प्रवीण अमरे (८१.२३, २३ सामने) आणि आता जैस्वाल (८०.२१, १५ सामने) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या तीन क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये सर्वात कमी प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या जैस्वालने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

हेही वाचा – IND vs WI 1st Test: टीम इंडियासाठी इशान-यशस्वी खेळणार डेब्यू मॅच, पाहा दोघांची आतापर्यंतची आकडेवारी

या यादीत भारताचा माजी दिग्गज रुसी मोदी (७१.२८, ३८ सामने) चौथ्या आणि सचिन तेंडुलकर (७०.१८, ९ सामने) पाचव्या क्रमांकावर आहे. या विक्रमात समावेश असलेल्या सचिन तेंडुलकरने सर्वात कमी ९ सामने खेळूनच भारतीय कसोटी कॅप मिळवली होती. विंडीज दौऱ्यात सामील असलेला आणखी एक फलंदाज शुबमन गिल (६८.७८, २३ सामने) यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

सामन्याबद्दल बोलायचे, तर वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना २८ षटकानंतर ४ बाद ६८ धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने विंडीजला पहिला धक्का दिला आहे. १३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने तेजनरीन चंद्रपॉलला बाद केले. चंद्रपॉल ४४ चेंडूत १२ धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्याचबरोबर दुसरा धक्का पण अश्विननेच दिला. त्याने विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले. ब्रॅथवेटने ४६ चेंडूत २० धावा केल्या.

हेही वाचा – IND vs WI Dominica Test: महेंद्रसिंग धोनीच्या ‘त्या’ निर्णयावर चाहत्यांकडून आजही होते टीका, जाणून घ्या काय प्रकरण?

वेस्ट इंडिजला बसला चौथा धक्का –

शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच षटकात टीम इंडियाला यश मिळवून दिले. डावाच्या २०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने रॅमन रेफरला बाद केले. रेफरला १८ चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. त्याने यष्टिरक्षक इशान किशनकडे झेल सोपवला. इशानचा हा कसोटीतील पहिला झेल आहे. रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजला चौथा धक्का दिला. त्याने जर्मेन ब्लॅकवूडला मोहम्मद सिराजकरवी झेलबाद केले.

ब्लॅकवूडने ३४ चेंडूत १४ धावा केल्या. डायव्हिंग करताना सिराजने शानदार झेल घेतला. ब्लॅकवुड आऊट होताच लंचची घोषणा झाली. वेस्ट इंडिजने चार विकेट गमावत ६८ धावा केल्या आहेत. अ‍ॅलीक एथानेज २६ चेंडूत १३ धावा करून नाबाद आहे. भारताकडून अश्विनने दोन विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.