Yashasvi Jaiswal Century in IND vs AUS Perth Test: पर्थच्या बालेकिल्ल्यात भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने उत्कृष्ट फलंदाजी करत शतक झळकावले आहे. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या यशस्वी जैस्वालने पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी कामगिरी करत आपली खेळीचा परिचय सर्वांना करून दिला आहे. पर्थ कसोटीतील पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल आपले खातेही उघडू शकला नाही आणि शून्यावर बाद झाला. यशस्वी जैस्वालने ९५ धावांवर असताना षटकार लगावत ऑस्ट्रेलियातील पहिले शतक झळकावले आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या यशस्वीने षटकारासह २०५ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकारांसह १०१ धावा केल्या आहेत. यशस्वीच्या शतकानंतर भारताची आघाडी २५० धावांच्या जवळ पोहोचली आहे. या शतकासह यशस्वी जैस्वालने कसोटीतील आपले चौथे कसोटी शतक झळकावले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना, एअरपोर्टवर पत्नी रितिकाने ‘असा’ दिला भावनिक निरोप; VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma Century 2nd Fastest Hundred For India in just 37 Balls vs England
Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचं ऐतिहासिक शतक, षटकारांचा पाडला पाऊस; रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

यशस्वी जैस्वालचे ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिलेच शतक

यशस्वी जैस्वालचे ऑस्ट्रेलियन भूमीवरील हे पहिले शतक ऐतिहासिक ठरले आहे. तब्बल ४७ वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियात असे खास शतक ठोकले आहे. याआधी भारतासाठी ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी सामन्यात केवळ दोनच फलंदाजांनी शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा जैस्वाल हा भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात शतक झळकावणं हे सर्वात कठीण काम आहे आणि जैस्वालने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात ही कामगिरी फत्ते केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS: यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम, कसोटीत एका कॅलेंडर वर्षात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

यशस्वी जैस्वालआधी सुनील गावस्कर यांनी १९७७ मध्ये ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. त्यानंतर आता ४७ वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. हा पराक्रम पहिल्यांदा १९६८ मध्ये मोटागनहल्ली जयसिम्हा यांनी केला होता. त्यांनीही ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. २०१४ साली टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयला पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियात शतक करण्याची संधी मिळाली होती, पण ॲडलेड कसोटीत मुरली विजय ९९ धावा करून बाद झाला होता.

हेही वाचा – IND vs AUS: “तू खूप स्लो बॉलिंग…’, यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला डिवचत झळकावलं शानदार अर्धशतक, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियात पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावणारे भारतीय फलंदाज

१०१ – एमएल जयसिम्हा, ब्रिस्बेन, १९६७-६८
११३ – सुनील गावस्कर, ब्रिस्बेन, १९७७-७८
१०१* – यशस्वी जैस्वाल, पर्थ, २०२४

\

Story img Loader