Yashasvi Jaiswal Out or Not Out in IND vs AUS Melbourne Test: मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. पण यादरम्यान यशस्वी जैस्वाल मात्र मैदानात टिकून होता आणि ८२ धावा करून खेळत होता. पण यशस्वी जैस्वालला मात्र या सामन्यात वादग्रस्तरित्या बाद दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वी जैस्वाल या डावात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि टीम इंडियासाठी महत्त्वाची खेळी खेळत होता. मात्र तिसऱ्या पंचांनी त्याला ज्या पद्धतीने आऊट दिले, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिसऱ्या पंचांनी स्निकोमीटरवर हालचाल नसतानाही यशस्वी जैस्वालला बाद दिलं आहे.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित-विराट कसोटीतून निवृत्ती घेणार? रवी शास्त्रींनी दिले महत्त्वाचे अपडेट, भारतीय कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य

यशस्वी जैस्वाल या सामन्यात २०८ चेंडूत ८४ धावा करून बाद झाली. पण भारतीय डावाच्या ७१व्या षटकात त्याने आपली विकेट गमावली. पॅट कमिन्सने लेग साईडवर एक शॉर्ट बॉल टाकला होता, ज्यावर जैस्वालला मोठा शॉट खेळायचा होता, पण हा चेंडू तिसऱ्या पंचांच्या मतानुसार त्याच्या बॅटला लागला आणि यष्टिरक्षकाच्या हातात गेला. पण मैदानावरील पंच जोएल विल्सन यांनी त्याला आऊट दिले नाही. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – IND Vs AUS: रोहित शर्माला बाद करत पॅट कमिन्सने केला विश्वविक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार

सामन्यात तिसऱ्या पंचाची भूमिका बजावणाऱ्या बांगलादेशच्या शरफुद्दौला यांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली, मात्र स्निकोमीटरमध्ये कोणतीही हालचाल दिसली नाही. साधारणपणे, स्निकोमीटरमध्ये कोणतीही हालचाल नसल्यास, फलंदाजाला नाबाद घोषित केले जाते. पण शरफुद्दौलाने यशस्वीला बाद घोषित केले.

त्यांनी या विकेटचा रिप्ले अनेक कोनातून पाहिला आणि व्हिडिओमधील डिफ्लेक्शन पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिला. जैस्वालला आऊट देताना तिसरे पंच म्हणाले, ‘बॉल ग्लोव्हजला स्पर्श करून गेल्याचे मला दिसत आहे. जोएल, तुमचा निर्णय बदलावा लागेल.’ त्यानंतर मैदानावरील पंचांना त्याला आऊट द्यावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal controversial wicket he given out despite no edge on snicko in ind vs aus melbourne test bdg