Yashasvi Jaiswal Century: मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. यशस्वीने डोमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. त्याने गुरुवारी (१३ जुलै) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात शतक झळकावले. यशस्वीने कर्णधार रोहित शर्मासोबत २२९ धावांची भागीदारी केली. रोहित १०४ धावा करून बाद झाला. यशस्वीने शतक ठोकत अनेक विक्रम मोडले. पदार्पणातच शतक झळकावणारा तो १७वा भारतीय फलंदाज आहे.

श्रेयस अय्यरने यशस्वीच्या आधीच्या शेवटच्या पदार्पणाच्या कसोटीत भारतासाठी शतक झळकावले. त्याने २०२१ मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १०५ धावा केल्या होत्या. लाला अमरनाथ हे भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे पहिले भारतीय खेळाडू होते. त्यांनी १९३३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

यशस्वीने इतिहास रचला

यशस्वीबद्दल बोलायचे झाले तर पदार्पणातच शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय सलामीवीर आहे. शिखर धवनने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये आणि पृथ्वी शॉने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये केले होते. यशस्वीने परदेशी भूमीवर पदार्पण करताना पहिल्याच कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. एवढेच नाही तर वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात शतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने २०१३ मध्ये कोलकात्यात १७७ धावा केल्या होत्या. त्याचवेळी पृथ्वी शॉने २०१३ मध्ये राजकोटमध्ये १३४ धावा केल्या होत्या.

यशस्वी जैस्वालने शतक ठोकून रचला अनेक विक्रम

२१ वर्षीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणातच शतक ठोकून इतिहास रचला. खरे तर फार कमी भारतीय खेळाडूंनी भारताबाहेर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. आता त्या यादीत यशस्वी जैस्वालचेही नाव जोडले गेले आहे. जैस्वालच्या आधी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, अब्बास अली बेग, प्रवीण अमरे आणि सुरिंदर अमरनाथ यांनी ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा जैस्वाल आता सातवा खेळाडू ठरला आहे.

जैस्वालने २१५ चेंडूत शतक ठोकले

मुंबईच्या यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध २१५ चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. या खेळीत त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ११ चौकार आले आहेत. आयपीएलमधील झंझावाती फलंदाजीसाठी जयस्वाल ओळखला जातो. पण त्याने कसोटी खेळताना खूप संयमाने फलंदाजी केली. त्याने आपल्या डावात एकही वाईट शॉट खेळला नाही. यासह २१ वर्षीय यशस्वी भारताबाहेर पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा पहिला सलामीवीर ठरला आहे.

हेही वाचा: IND vs WI: “विराट भाई थोड़ासा सीधा बस…” इशान किशनने दिल्या कोहलीला फिल्डिंगच्या सूचना, मजेशीर Video व्हायरल

वेस्ट इंडिजवर १६२ धावांची भक्कम आघाडी

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ १५० धावांवर बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने यजमान संघ वेस्ट इंडिजवर आतापर्यंत पहिल्या डावात १६२ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने २२१ चेंडूत १०३ धावांची शतकी खेळी केली. दुसरीकडे युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वीने ३५० चेंडूत नाबाद १४३ धावा केल्या. यादरम्यान त्याने १४ चौकार मारले. या खेळीसह यशस्वीने अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

Story img Loader