IND vs AUS 4th Test Day 4 Updates in Marathi: मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने उत्कृष्ट गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. बुमराह, सिराज, आकाशदीप यांनी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकेक धाव घेण्यासाठी तंगवले. पण यादरम्यान भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालकडून १-२ नव्हे तीन वेळा तीच चूक घडली. यशस्वी जैस्वालने क्षेत्ररक्षण करताना ३ झेल सोडले आहेत.

चौथ्या दिवशी खेळाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत यशस्वी जैस्वालने एकूण ३ मोठे झेल सोडले आहेत. यशस्वीने प्रथम उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. यानंतर त्याने मार्नस लबुशेन आणि पॅट कमिन्स यांचेही सोपे झेल टिपू शकला नाही. स्लिपमध्ये नेहमी क्षेत्ररक्षण करताना चांगली कामगिरी करणाऱ्या यशस्वीने या सामन्यात मात्र निराश केलं आहे. यानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतप्त दिसत होता, ज्याचा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

Why Did Nitish Reddy Keep His Helmet On Bat After Maiden International Century During IND vs AUS 4th Test
IND vs AUS : नितीश रेड्डीने शतकानंतर बॅटवर का अडकवले हेल्मेट? स्वत:च केला खुलासा, कारण जाणून कराल सलाम
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
IND vs AUS Virat Kohli I am your father Australian newspaper crossed all limits
Virat Kohli : ‘विराट, मी तुझा बाप…’, ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने ओलांडली निर्लज्जपणाची सीमा, भारतीय चाहत्यांचा चढला पारा
IND vs AUS Michael Hussey reflects on Rohit Sharmas reaction to Labuschagnes dropped catch at MCG
IND vs AUS : ‘विकेटची नितांत गरज होती, पण…’, जैस्वालकडून झेल सुटल्यानंतर संतापलेल्या रोहितवर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची टीका
Jasprit Bumrah Clean Bowled Sam Konstas in 2nd Innings with Animated Celebration Watch Video IND vs AUS
IND vs AUS: जसप्रीत बुमराहने सॅम कॉन्स्टसचा त्रिफळा उडवला, क्लीन बोल्ड करताच केलं भन्नाट सेलिब्रेशन; असा घेतला बदला… पाहा VIDEO
Prajakta Mali CM Devendra Fadnavis Meet
Prajakta Mali CM Devendra Fadnavis Meet : अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, दिग्गजांना मागे टाकत ठरला जगातील नंबर वन गोलंदाज

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ४०व्या षटकात यशस्वी जैस्वालने मार्नस लबुशेनचा झेल सोडल्याचे दिसत आहे. आकाशदीप ४०व्या षटकात गोलंदाजी करत होता. यादरम्यान मार्नसला स्लिपमध्ये झेलबाद न केल्याने कर्णधार रोहित शर्मा यशस्वीवर चिडला.

हेही वाचा – IND vs AUS: सिराजच्या विकेटवरून मोठा ड्रामा, कमिन्सने तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर घेतला रिव्ह्यू; मैदानावरील पंचांनी पाहा काय केलं?

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकात यशस्वी जैस्वालने लेग गलीवर उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. हा झेल सोडला तेव्हा उस्मान १ धाव घेऊन खेळत होता. मात्र, सिराजने त्याला २१ धावांवर क्लीन बोल्ड केले.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने सॅम कॉन्स्टसचा त्रिफळा उडवला, क्लीन बोल्ड करताच केलं भन्नाट सेलिब्रेशन; असा घेतला बदला… पाहा VIDEO

यशस्वी जैस्वालने स्लिपमध्ये मार्नस लबुशेनचा झेल सोडला, ज्याचा त्याने निश्चितच फायदा उठवला. मार्नसचा झेल सोडला तेव्हा तो ४६ धावांवर फलंदाजी करत होता. यानंतर डावाच्या ४३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लबुशेनने ५० धावा पूर्ण केल्या. मार्नसनंतर यशस्वीने तीच चूक पुन्हा केली आणि ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची कॅच ड्रॉप करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. खेळाच्या दुसऱ्या सत्रातील शेवटच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर त्याने कमिन्सचा झेल सोडला. यावेळी रोहित खूप रागावलेला दिसत होता. मार्नस लबुशेनला ७० धावांवर अखेरीस सिराजने पायचीत करत पॅव्हेलियनमध्ये धाडले, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने २५० धावांची आघाडी मिळवली होती.

Story img Loader