Yashasvi Jaiswal Equals Record of Sachin Tendulkar: यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिल्यांदा खेळताना शानदार शतक झळकावून इतिहास घडवला. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या जैस्वालने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल तिसऱ्या दिवशी २९७ चेंडूत ३ षटकार १५ चौकारांसह १६१ धावा केल्या आहेत. २२ वर्षीय यशस्वीने शतकासह थेट सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

जैस्वालच्या शतकाच्या बरोबर ३२ वर्षांपूर्वी, १७ वर्षीय सचिन तेंडुलकरने WACA च्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना शेवटच्या दोन दिवसांत शतक झळकावून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता जैस्वालने पर्थच्या बालेकिल्ल्यात शतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. २२ वर्षीय जैस्वाल हा ऑस्ट्रेलियात कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर शतक झळकावणारा भारताचा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी हा मोठा पराक्रम सुनील गावस्कर यांनी १९७७ मध्ये केला होता.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

हेही वाचा – Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जैस्वालचे ऐतिहासिक शतक, ४७ वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियात केली ‘ही’ कामगिरी; सेलिब्रेशनचा VIDEO

यशस्वी जैस्वालने पर्थमध्ये ऐतिहासिक शतक झळकावून अनेक मोठे विक्रम केले. जैयस्वाल २३ वर्षांचा होण्यापूर्वी त्याने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. अशाप्रकारे, त्याने २३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांची बरोबरी केली.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना, एअरपोर्टवर पत्नी रितिकाने ‘असा’ दिला भावनिक निरोप; VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – IND vs AUS: राहुल-जैस्वालच्या जोडीने घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात आजवर कोणत्याच भारतीय फलंदाजांनी केली नव्हती अशी कामगिरी

२३ वर्षापूर्वी सर्वाधिक कसोटी शतकं करणारे भारतीय फलंदाज

८ – सचिन तेंडुलकर
५ – रवी शास्त्री
४ – सुनील गावस्कर
४ – विनोद कांबळी
४ – यशस्वी जैस्वाल

२०२४ मध्ये जैस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने १२०० हून अधिक धावा केल्या आहेत. २०२४ मध्ये त्याने ४ कसोटी शतकं झळकावली आहेत. यासह, तो २३ वर्षांच्या होण्याआधी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

हेही वाचा – Rishabh Pant: ऋषभ पंतने रस्ते अपघातात जीव वाचवणाऱ्या ‘त्या’ दोघांना दिलं खास गिफ्ट, ऑस्ट्रेलियन मीडियाच्या VIDEO मध्ये आलं समोर

२३ वर्षांचा होण्यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी शतकं करणारे फलंदाज (भारत)

४ – सुनील गावस्कर १९७१ मध्ये
४ – विनोद कांबळी १९३३ मध्ये
३ – रवी शास्त्री १९८४ मध्ये
३ – सचिन तेंडुलकर १९९२ मध्ये
३ – यशस्वी जैस्वाल २०२४ मध्ये

ऑस्ट्रेलियात पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावणारे भारतीय फलंदाज

१०१ – एमएल जयसिम्हा, ब्रिस्बेन, १९६७-६८
११३ – सुनील गावस्कर, ब्रिस्बेन, १९७७-७८
१०१* – यशस्वी जैस्वाल, पर्थ, २०२४

जैस्वालच्या १५० धावा

जैस्वालच्या शतकामुळे भारतीय संघाने पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत दुसऱ्या डावात एका विकेटच्या मोबदल्यात २७५ धावा करत यजमान संघाविरुद्धची एकूण आघाडी ३२१ धावांपर्यंत वाढवली. भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात एकमेव विकेट केएल राहुलच्या (७७) रूपाने गमावली. लंच ब्रेकनंतरही जैस्वालचा शानदार खेळ सुरूच राहिला आणि त्याने झटपट १५० धावा पूर्ण केल्या. त्याने २७५ चेंडूत १५० धावांचा आकडा गाठला. अशाप्रकारे, त्याने वयाच्या २३ वर्षांचा होण्यापूर्वी कसोटीत सर्वाधिक १५० अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जावेद मियांदाद, ग्रॅमी स्मिथ आणि सचिन तेंडुलकर यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

२३ वर्षांचा होण्यापूर्वी कसोटीत सर्वाधिक १५० अधिक धावा करणारे फलंदाज

८ – डॉन ब्रॅडमन
४ – जावेद मियांदाद
४ – ग्रॅम स्मिथ
४ – सचिन तेंडुलकर
४- यशस्वी जैस्वाल

Story img Loader