Yashasvi Jaiswal New 5BHK Flat in Mumbai: युवा क्रिकेटर यशस्वी जैस्वालने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात आपल्या शानदार शतकासह अमिट छाप पाडली. कसोटी क्रिकेटच्या विश्वात पदार्पण केल्यानंतर जैस्वालने आपल्या कुटुंबाला मुंबईत एक आलिशान नवीन घर भेट म्हणून दिले आहे. २१ वर्षीय खेळाडू सध्या मुंबईत  भाड्याच्या २ बीएचके फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहत होता. मात्र, आता जैस्वालने मुंबईत एका प्रशस्त ५बीएचके फ्लॅटचे घेतला असून त्याने तो त्याच्या आई-वडिलांना भेट दिला आहे. जैस्वाल यांच्या कुटुंबाला या निर्णयामुळे खूप आनंद झाला आहे, जे त्यांच्या मुलाच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि वचनबद्धतेचे साक्षीदार आहेत.

यशस्वीचे कुटुंबीयही त्याच्या स्वागताची वाट पाहत आहेत. मात्र जैस्वाल भारतात परतल्यावर ते त्यांच्या जुन्या घरी जाणार नाहीत. खरं तर, जेव्हा तो शतक झळकावत होता, तेव्हा त्याचे कुटुंब डॉमिनिकापासून १४००० किमी दूर ठाण्यात ५ रूमच्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते. त्यांचे कुटुंब नवीन घरासाठी नवीन सामान खरेदी करत होते. मूव्हर्स आणि पॅकर्समध्ये व्यस्त होते. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, जैस्वालला त्याचे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून राहत असलेल्या भाड्याच्या २BHK मध्ये जायचे नव्हते. त्याचे वडील सध्या कावड यात्रेसाठी गेले आहेत.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: “हाताला फोड येईस तोपर्यंत एकाच शॉटचा तो…”, यशस्वी जैस्वालच्या प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

यशस्वी जैस्वालच्या भावाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला, “यशस्वीची नेहमीच एक इच्छा होती की, स्वतःचे घर असावे.” त्याचे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. या युवा फलंदाजाने त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांप्रमाणेच हे गोष्ट देखील प्रत्यक्षात आणली.” यशस्वी जैस्वालला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि इथूनच त्याच्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू झाला. आपल्या शानदार कामगिरीने त्याने केवळ आपले पदार्पण संपूर्ण देशासाठी संस्मरणीय बनवले नाही, तर या शानदार कामगिरीने आपल्या कुटुंबासाठी पाहिलेली स्वप्नेही पूर्ण केली.

कधी काळी झोपडीत राहणारा, पाणीपुरी विकणारा, आयपीएल खेळ पाहण्यासाठी झाडावर चढणाऱ्या २१ वर्षीय तरुणांसाठी ही एक नवीन सुरुवात आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ३८७ चेंडूत १७१ धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावला. यशस्वी जैस्वालला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: “देवाकडे फक्त एकच प्रार्थना…”, ‘शतकवीर’ यशस्वी हॉटेलमध्ये परतताना स्वतःशीच काय बोलत होता? पाहा Video

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने १७१ धावांची संस्मरणीय खेळी करत अनेक नवे विक्रम केले. आता तो परदेशी भूमीवर भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत १५० पेक्षा जास्त धावा करणारा यशस्वी तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी केवळ शिखर धवन आणि टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा हेच हे करू शकले आहेत.