Yashasvi Jaiswal Runout Video Viral During IND vs AUS Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्न येथे खेळली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाने यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या भागीदारीच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यशस्वी जैस्वालच्या रनआऊटमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशस्वी जैस्वाल रनआऊट –

भारताला १५३ धावांवर तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल ८२ धावा करून रनआऊट झाला. यशस्वीने डावाच्या ४१व्या षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळला. चेंडू मिडऑनला गेला आणि यशस्वी धाव घेण्यासाठी धावला. यावेली कॉल त्याचाच होता आणि कोहलीही थोडा पुढे आला होता. मात्र, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातात तो माघारी फिरला. तो पर्यंत खूप उशीर झाला होता. कारण यशस्वीही नॉन स्ट्राइक एंडला विराटजवळ पोहोचला होता. त्यामुळे दोघेही एकाच टोकाला उपस्थित होते आणि कॅरीने चेंडू स्टंपवर मारला आणि यशस्वी रनआऊट झाला. तो ११८ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८२ धावा करून बाद झाला.

विराट कोहलीने पुन्हा केली निराशा –

ऑस्ट्रेलियाने दोन षटकांत दोन विकेट्स घेतल्या. यशस्वी धावबाद झाल्यानंतर कांगारूंनी विराट कोहलीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जैस्वाल आऊट झाल्यानंतर सेट झालेल्या विराटची एकाग्रता भंग झाली आणि तो बोलंडच्या षटकात झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टिरक्षक कॅरीने टिपला. त्याला ८६ चेंडूत ३६ धावा करता आल्या. सध्या ऋषभ पंत आणि नाईट वॉचमन आकाश डीप क्रीजवर आहेत. एके काळी भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १५३ अशी होती, जी आता चार विकेट्सवर १५४ अशी झाली.

हेही वाचा – IND vs AUS : ‘यार, त्याला आऊट करायचंय… मग कोण करणार? मी?’ रोहित-जडेजाचा संवाद स्टंप माईकमध्ये कैद, पाहा VIDEO

भारताला पाचवा धक्का –

जैस्वाल-विराटनंतर भारताला १५९ धावांवर पाचवा धक्का बसला. सहा धावांच्या आत भारताने तीन विकेट्स गमावल्या आहेत. आकाश दीपला बोलंडने लायनच्या हाती झेलबाद केले. तो नाईट वॉचमन म्हणून आला होता. आकाशला खाते उघडता आले नाही. सध्या रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत नाबाद आहेत. तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल ८२ धावा करून बाद झाला तर विराट कोहली ३६ धावा करून बाद झाला. रोहित तीन धावा करून आणि राहुल २४ धावा करून बाद झाला.