Yashasvi Jaiswal has entered the top 10 in the ICC Test rankings : टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जवळपास प्रत्येक डावात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. यामुळेच तो आयसीसी कसोटी क्रमवारीतही पुढे जात आहे. दरम्यान, जैस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले सर्वकालीन उच्च स्थान गाठले आहे. त्याने आधीच आपला कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले होते, आता त्याने टॉप-१० मध्ये शानदार प्रवेश केला आहे.
जैस्वाल आयसीसी कसोटी क्रमवारीत दहाव्या स्थानावर –
यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरुद्ध खूप धावा करत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे होणार आहे. यामध्येही अनेक मोठे विक्रम त्याच्या लक्ष्यावर असणार आहेत. दरम्यान, सामन्याच्या एक दिवस आधी यशस्वी जैस्वालने आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे. तो सध्या दहाव्या क्रमांकावर आहे.
याआधी, आयसीसीने गेल्या आठवड्यात क्रमवारी जाहीर केली, तेव्हा त्याचे रेटिंग पॉइंट ७२७ होते आणि तो १२व्या क्रमांकावर होता. दरम्यान, तो एकही कसोटी खेळला नाही, त्यामुळे त्याच्या मानांकनावर कोणताही परिणाम झालेला नाही. म्हणजेच तो अजूनही ७२७ धावांवर आहे, पण इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फायदा जैस्वाल झाला आणि तो थेट दहाव्या क्रमांकाचा पोहोचला आहे. हे देखील जैयस्वालचे आतापर्यंतचे उच्च क्रमवारी आहे. गेल्या आठवड्यातच त्याने रोहित शर्माला मागे टाकले होते.
हेही वाचा – IND vs ENG : १०० व्या कसोटीआधी अश्विनवर माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप; म्हणाला, “त्याने माझा…”
रोहित शर्मालाही झाला दोन स्थानांचा फायदा –
यशस्वी जैस्वालला दोन स्थानांचा फायदा झाला आहे, तर रोहित शर्मानेही १३व्या स्थानावरून ११व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग पॉइंट आता ७२० आहेत. शेवटच्या कसोटीत हे दोन खेळाडू धर्मशाला मैदानावर पुन्हा एकत्र खेळतील, तेव्हा त्यानंतर क्रमवारीत काय बदल होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, रोहित आणि जैस्वाल यांनी गेल्या आठवड्यापासून एकही कसोटी खेळलेली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचा त्यांना फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आता एका स्थानाने घसरून १२व्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ७१८ आहेत, तर मार्नस लाबुशेनने पाच स्थानाचे नुकसान झाले आहे. तो सध्या ७०७ च्या रेटिंग पॉइंटसह १३ व्या क्रमांकावर आहे. याचा फायदा रोहित आणि यशस्वी यांना मिळाला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर! ऑली रॉबिन्सनच्या जागी ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम –
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजाने गोलंदाजी क्रमवारीत एक स्थानाचे नुकसान झाले आहे. तो ७व्या क्रमांकावर घसरला आहे.