ICC Test Batter Rankings Yashasvi Jaiswal gains and Babar Azam loss : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटीदरम्यान आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. तर इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रूकला याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याचबरोबर भारताच्या विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनाही यावेळी फायदा झाला आहे.

यशस्वीला फायदा तर बाबरला बसला फटका –

आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमला सर्वाधिक फटका बसला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरला आहे. गेल्या आठवड्यात तो तिसऱ्या क्रमांकावर होता. सध्या तो टॉप १० मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय टीम इंडियाच्या तीन फलंदाजांना खूप फायदा झाला आहे. रोहित शर्मा सहाव्या स्थानावर घसरला आहे. यशस्वी जैस्वालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आता दोन स्थानांच्या प्रगतीसह आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

रिझवान, हॅरी ब्रूक आणि रहीम यांना झाला फायदा –

मँचेस्टरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चांगल्या कामगिरीनंतर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावणारा पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानलाही फायदा झाला आहे. तो सात स्थानांच्या प्रगतीसह संयुक्त १०व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने रावळपिंडी कसोटीत बांगलादेशविरुद्ध नाबाद १७१ आणि ५१ धावांची खेळी केली होती.

हेही वाचा – Ravichandran Ashwin : ‘तो निर्णय घेण्याचा अधिकार खेळाडूला…’, अश्विनचे ‘राईट टू मॅच’ आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर मोठे वक्तव्य

इंग्लंडच्या हॅरी ब्रूकबद्दल बोलायचे तर त्याला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने ५६ आणि ३२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १९१ धावांची खेळी करणाऱ्या मुशफिकर रहीमला सात स्थानांचा फायदा झाला आहे. तो १७ व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

गोलंदाजांमध्ये अश्विन अव्वल –

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा अनुक्रमे तिसऱ्या आणि सातव्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स चार स्थानांनी १६ व्या स्थानावर तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो १० स्थानांनी १७ व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – Shreyas Iyer : बुची बाबू स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या ‘बॉलिंग ॲक्शन’मध्ये दिसली सुनील नरेनची झलक, VIDEO होतोय व्हायरल

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह चार स्थानांनी ३३ व्या स्थानावर पोहोचला आहे आणि इंग्लंडचा गस ऍटकिन्सन चार स्थानांनी ४२ व्या स्थानावर पोहोचला आहे आणि त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा आणि अश्विन पहिल्या दोन स्थानांवर आहेत, तर अक्षर पटेल सहाव्या स्थानावर आहे.

Story img Loader