Yashasvi Jaiswal’s coach: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा युवा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सराव करण्यापासून कधीच मागे हटला नाही आणि हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे. तो एकाच शॉटचा सराव ३०० वेळा करत असे आणि त्यानंतरही त्याला थकवा जाणवला नाही. तो आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सकडूनही खेळतो आणि त्याने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर आणि मुंबईचे माजी फलंदाज झुबिन भरुचा यांनी सांगितले की, “जैस्वाल महाराष्ट्रातील तळेगाव येथील प्रशिक्षण शिबिरात ३०० वेळा एकाच शॉटचा सराव करत असे. आपली ताकद वाढवण्यासाठी त्याने बेसबॉल प्रशिक्षकासोबतही काम केले. तो बराच वेळ फलंदाजी करत असे आणि यामुळे त्याच्या हातावर फोडही यायचे.” यशस्वी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याच्या आयपीएल ट्रायल दरम्यान जैस्वालची प्रतिभा पाहिल्यानंतर, भरुचाने त्याचा खेळ सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जैस्वालने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केल्याने त्याला तळेगावला सरावासाठी पाठवण्यात आले होते.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

हेही वाचा: Virat Kohli: विराटने सामन्यादरम्यान लगावले ठुमके! किंग कोहलीच्या डान्सचा Video सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

वेगवेगळ्या वजनाचे बॉल आणि बॅट ड्रिल

भरुचा म्हणाले, “नागपूरपासून तळेगाव ९० मिनिटांच्या अंतरावर आहे. आम्हाला त्याला इतर गोष्टींपासून वेगळे करायचे होते जेणेकरुन त्यांच्या मनात अभ्यासाशिवाय काहीही येऊ शकणार नाही. कोविड-१९च्या काळातही तो तिथेच होता आणि अभ्यासासह तो क्रिकेटचा सराव करत होता. या काळातही त्याच्या प्रगतीत कोणताही अडथळा आला नाही. आमच्याकडे अतिशय स्पष्ट योजना होती. ३०० कट शॉट्स किंवा ३०० रिव्हर्स स्वीप किंवा ३०० पारंपारिक स्वीप असो, जोपर्यंत आम्ही त्या विशिष्ट शॉटमध्ये परफेक्ट होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.”

पुढे बोलताना भरुचा म्हणाले की, “२१ वर्षीय जैस्वाल हाताला फोड येईस तोपर्यंत एकाच शॉटचा तो अधिक सराव करत असे. आक्रमक स्ट्रोकच्या खेळात तो थोडा मागे होता, त्यामुळे आम्ही बेसबॉलसह सराव करण्यावर लक्ष केंद्रित केले. आम्ही त्याला बॉल आणि बॅट वेगवेगळ्या वजनाच्या देत असू आणि रोज १०० शॉट्स मारायला सांगायचो. यामध्ये त्याला १०० मीटर अंतरावर फटका मारण्याचे लक्ष्य दिले होते.”

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: “देवाकडे फक्त एकच प्रार्थना…”, ‘शतकवीर’ यशस्वी हॉटेलमध्ये परतताना स्वतःशीच काय बोलत होता? पाहा Video

यशस्वीचा शून्यातून प्रवास सुरू झाला- भरुचा

जेव्हा भरुचा जैस्वालला भेटले तेव्हा तो अवघा १८ वर्षाचा होता. ते म्हणाले, “चॅम्पियन बनवण्यासाठी गाव लागते, अशी एक म्हण आहे. यशस्वीच्या आतापर्यंतच्या प्रवासात योगदान देणारे अनेक लोक आहेत. तो कुठून आला हे त्याला नक्कीच माहीत आहे. त्याचा प्रवास शून्यातून सुरू झाला आहे. तो प्रवास आणखी पुढे आता जात राहील याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.”

Story img Loader