Yashasvi Jaiswal century 1st hundred on Australian soil during IND vs AUS Perth Test : भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियातील आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावून इतिहास लिहिला आहे, यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावून पर्थ कसोटीत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली आहे. यशस्वी जैस्वालने २०५ चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. या खेळीतील त्याच्या एका उत्तुंग षटकाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वी जैस्वालचे ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिलेच शतक –

यशस्वी जैस्वालचे ऑस्ट्रेलियन भूमीवरील हे पहिले शतक ऐतिहासिक ठरले आहे. तब्बल ४७ वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियात असे खास शतक ठोकले आहे. याआधी भारतासाठी ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी सामन्यात केवळ दोनच फलंदाजांनी शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा जैस्वाल हा भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात शतक झळकावणं हे सर्वात कठीण काम आहे आणि जैस्वालने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात ही कामगिरी फत्ते केली आहे.

जैस्वालने नॅथनच्या षटकात लगावला गगनचुंबी षटकार –

पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले, ज्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट घेण्याची अजिबात संधी दिली नाही. यशस्वीने आपल्या खेळीदरम्यान संयम आणि आक्रमकता दोन्ही दाखवले. त्याने खराब चेंडूंवर धावा करण्याची एकही संधी वाया घालवली नाही, तर चांगल्या चेंडूंचाही सन्मान केला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या सत्रात, यशस्वीने ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनविरुद्ध आक्रमक शैली दाखवली, ज्यामध्ये त्याने पुढे सरसावत लाँग-ऑनच्या दिशेला १०० मीटर लांब गगनचुंबी षटकार मारला.

हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतने अनोखे शतक झळकावत घडवला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय यष्टीरक्षक

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा ठरला खेळाडू –

यशस्वी जैस्वाल आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे, ज्यामध्ये त्याने ब्रेंडन मॅक्क्युलमचा विक्रम मोडला आहे, ज्याने एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३३ षटकार मारले होते. त्याने २०१४ मध्ये हा पराक्रम केला होता. यानंतर यशस्वी जैस्वालने २०२४ मध्ये आतापर्यंत ३६ षटकार मारले आहेत. यामध्ये निश्चितपणे वाढ होईल. कारण पर्थ कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाला या वर्षी अजून तीन कसोटी सामने खेळायचे आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal hitting a 100 meter six against nathan lyon during his maiden century in australia video viral in ind vs aus vbm