Yashasvi Jaiswal may get a chance to make his debut: भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी प्रोव्हिडन्स येथे एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

या वर्षी होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने या टी-२० मालिकेसाठी फारसे औचित्य नाही, पण कर्णधार हार्दिक पंड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांना वैयक्तिकरित्या आणि संघ म्हणूनही चांगली कामगिरी करायची आहे. या दोघांशिवाय इशान किशन, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांचीही नजर एकदिवसीय विश्वचषकावर आहे. परंतु आशिया चषकापूर्वी काही चांगल्या खेळी खेळून ते आपला आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न करतील.

Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
West Indies defeated by Indian women team sports news
भारतीय महिला संघाकडून विंडीजचा धुव्वा
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास
India Women Beat West Indies by 60 Runs in decider to win first home T20I series in five years
INDW vs WIW: भारतीय महिला संघाने संपवला ५ वर्षांचा दुष्काळ, वेस्ट इंडिजला नमवत मिळवला विक्रमी टी-२० मालिका विजय
WTC Points Table After Gabba Test Match Drawn What Will be India's World Test Championship Final Scenario
WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण?
IND vs AUS Australia Declared Innings on 89 Gives 275 Runs Target to India in 54 Overs in Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम, झटपट धावा करत भारताला विजयासाठी दिलं इतक्या धावांचं लक्ष्य
Rohit Sharm Trolled for Bowling First in IND vs AUS 3rd Test in Brisbane
IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?

यशस्वी जैस्वालला मिळू शकते पदार्पणाची संधी –

आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तिलक वर्मा (२२चेंडूत ३९) वगळता भारताचा एकही आयपीएल स्टार प्रभावित करू शकला नाही. नऊ दिवसांत तीन देशांमध्ये (त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना आणि अमेरिका) पाच टी-२० सामने खेळवले जाणार आहेत, त्यामुळे हार्दिक, गिल, इशान, फिरकीपटू कुलदीप यादव यांनाही पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. टी-२० संघात युवा खेळाडू असूनही एवढा प्रवास करणे आणि विश्रांतीशिवाय उसळत्या खेळपट्ट्यांवर सतत खेळणे चांगले नाही. पुढील वर्षी, टी-२० विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे, त्यामुळे या मालिकेने भारताला सर्वात लहान स्वरूपातील पर्याय शोधण्याची संधी दिली आहे. अशा परिस्थितीत आयपीएल स्टार यशस्वी जैस्वाललाही संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा – MS Dhoni: कॅप्टन कूलची मुलगी झिवा रांचीच्या ‘या’ शाळेत शिकते, फी जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य वाटेल

प्रॉव्हिडन्समध्ये वेस्ट इंडिजचा कसा आहे विक्रम –

फलंदाजीत चांगली कामगिरी करण्याला भारताचे प्राधान्य असेल. या मैदानावर खेळल्या गेलेल्या ११ टी-२० सामन्यांपैकी तीन पावसाचे बळी ठरले, तर यजमानांनी आठपैकी पाच सामने गमावले. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये वाईट अवस्था असूनही, वेस्ट इंडिजचा संघ टी-२० मध्ये मजबूत आहे. कारण त्याच्याकडे अनेक मोठे हिटर आहेत. निकोलस पूरन, काइल मेयर्स, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड हे त्यात प्रमुख आहेत, ज्यांच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.

हेही वाचा – Global T20 Canada: मोहम्मद रिझवानच्या स्लेजिंगमुळे इफ्तिखार अहमदने गमावली विकेट, VIDEO होतोय व्हायरल

सूर्यकुमार यादवला भारतासाठी मोठी खेळी खेळण्याची गरज आहे. त्याच वेळी, सॅमसन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या प्रतिभेला न्याय देऊ शकला नाही. गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहलला एकदिवसीय सामन्यात संधी मिळू शकली नाही, जो येथे आपली योग्यता सिद्ध करू इच्छितो. अर्शदीप सिंग अजूनही डेथ ओव्हर्समध्ये शिकत आहे. आवेश खान आणि उमरान मलिक यांनाही संधी दिली जाऊ शकते जेणेकरून ते ‘या’ खेळपट्ट्यांवर एक्स फॅक्टर बनू शकतात की नाही हे पाहता येईल.

Story img Loader