Yashasvi Jaiswal record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्याच्या मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे, ज्यामध्ये खेळाच्या तिसऱ्या दिवशी किवी संघ आपल्या दुसऱ्या डावात २५५ धावांवरच मर्यादित होता. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला चौथ्या डावात ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने तिसऱ्या दिवसाच्या खेळात शानदार कामगिरी केली, ज्यात त्याने घरच्या मैदानावर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतासाठी ७७ धावांच्या खेळीत केला. याशिवाय यशस्वीने अशी कामगिरी केली या खेळीदरम्यान केली की तो ही कामगिरी करणारा एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या यशस्वी जैस्वालने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात ३० किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम करणारा जैस्वाल हा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. २०२४ मध्ये जयस्वालने कसोटीत ३० षटकार मारले आहेत. त्याच वेळी, जागतिक क्रिकेटमध्ये, जैस्वाल कसोटीत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज आहे. या बाबतीत न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – Glenn Maxwell: “तुझ्यासारख्या चाहत्याची गरजही नाही…”, ग्लेन मॅक्सवेलचे सेहवागवर गंभीर आरोप, पंजाब किंग्स संघाबाबतही केला धक्कादायक खुलासा

मॅक्युलमने २०१४ मध्ये एका कॅलेंडर वर्षात ३३ षटकार लगावले होते. या बाबतीत बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आहे, स्टोक्सने एका कॅलेंडर वर्षात २६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. २०२२ मध्ये स्टोक्सने कसोटीत २६ षटकार लगावले होते.

एका कॅलेंडर वर्षात कसोटीत सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

३३ – ब्रेंडन मॅक्युलम (२०१४)
३२ – यशस्वी जैस्वाल (२०२४)*
२६ – बेन स्टोक्स (२०२२)
२२ – ॲडम गिलख्रिस्ट (२००५)
२२ – वीरेंद्र सेहवाग (२००८)

हेही वाचा – Jemimah Rodrigues : आम्ही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले पण धर्मांतर वगैरे काहीही नव्हतं, जेमिमाच्या वडिलांचं स्पष्टीकरण

यशस्वीने तोडला गुंडप्पा विश्वनाथ यांचा विक्रम

भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे, तर याआधी हा विक्रम गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर होता, ज्यांनी १९७९ मध्ये घरच्या मैदानावर १३ कसोटी सामने खेळले होते. एकूण ६१.५८ च्या सरासरीने १०४८ धावा केल्या. तयानंतर २०२४ मध्ये घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये ६६ च्या उत्कृष्ट सरासरीने १०५६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून २ शतके आणि ७ अर्धशतके देखील केली आहेत.

भारतासाठी एका वर्षात घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू

यशस्वी जैस्वाल – १०५६ धावा (वर्ष २०२४)
गुंडप्पा विश्वनाथ – १०४७ धावा (वर्ष १९७९)
विराट कोहली – ९६४ धावा (२०१६)
विराट कोहली – ८९८ धावा (२०१७)
दिलीप वेंगसरकर – ८७५ धावा (१९८७)
सुनील गावसकर – ८६५ धावा (१९७९)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal record of most sixes in a calendar year in test first indian to achieve this historic feat ind vs nz bdg