IND vs AUS Yashasvi Jaiswal Sam Konstas Fight Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला १८४ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या कसोटीत बॅकफूटवर असला तरी त्यांनी चांगलं पुनरागमन केलं होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी माऱ्यापुढे टीम इंडियाचे फलंदाज कमी पडले. भारतावरील या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्न कसोटी यशस्वी जैस्वालसाठी फारच दुर्दैवी ठरली, वादग्रस्तपणे बाद झाल्याने यशस्वीचे या सामन्यात शतक हुकलं. पण तत्पूर्वी यशस्वी आणि कॉन्स्टसमध्ये मैदानात भांडण झालं होतं; ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल ८२ धावा करून बाद झाला तर दुसऱ्या डावात ८४ धावा करत बाद झाला आणि अशारितीने त्याला दोन्ही डावात आपले शतक पूर्ण करता आले नाही. पण या सामन्यादरम्यान एक वेळ अशी आली की पंत आणि जैस्वाल यांच्यातील भागीदारी पाहता टीम इंडिया हा सामना जिंकू शकेल असे वाटत होते. तेव्हा ऑस्ट्रेलिया पूर्णपणे निराश झाली होती आणि नेमकं त्याचदम्यान जैस्वाल आणि कॉन्स्टास यांच्यात भांडण झाली.

हेही वाचा – IND vs AUS: “…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य

यशस्वी जैस्वाल आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात का वादावादी झाली?

मैदानातच जैस्वाल आणि कॉन्स्टास यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर जैस्वालने आपल्या बॅटने कॉन्स्टासला प्रत्युत्तर दिले. नकळत कॉन्स्टासला जैस्वालकडून असं काही प्रत्युत्तर मिळालं जे कॉन्स्टास कधीच विसरू शकणार नाही. पण या दोघांमध्ये नेमका वाद कशावरून झाला?

हेही वाचा – Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जैस्वाल आऊट की नॉट आऊट? तिसर्‍या पंचांच्या निर्णयावरून मतमतांतरं; पुन्हा एकदा भारताविरूद्ध चुकीचा निर्णय?

यशस्वी जैस्वाल फलंदाजी करत असताना त्याच्याजवळ फिल्डिंग करत असलेला सॅम कॉन्स्टस सातत्याने काही ना काही बोलून यशस्वी जैस्वालला त्रास देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भारतीय फलंदाजाने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र त्यानंतर वैतागलेल्या यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला जोरदार फटकारले. सर्वात आधी तर जैस्वाल कॉन्स्टसवर ओरडला आणि त्याला म्हणाला आपलं काम कर. यानंतर तो एलेक्स कॅरीला म्हणतो हा का माझ्याशी बोलतोय? त्यानंतर ऋषभ पंतला यशस्वी तेच सांगतो.

हेही वाचा – IND vs AUS: अश्विनच्या मेलबर्न कसोटीदरम्यान खोचक पोस्ट व्हायरल, रोहित-विराटला केलं लक्ष्य? ट्रोलिंगनंतर स्वत:च सांगितलं सत्य

पुढच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने एक दणदणीत फटका खेळला जो चांगलाच सॅम कॉन्स्टासला लागला. जैस्वालचा तो फटका इतका वेगवान होता की स्लो मोशनमध्ये त्याचा अंदाज आला. वेगाने आलेला हा चेंडू थेट कॉन्स्टासच्या पाठीवर लागली. त्याने चेंडू लागल्यावर लगेच काही प्रतिक्रिया नाही दिली पण चेंडू चांगलाच जोरात लागला असणार याची कल्पना समालोचन करणाऱ्या इरफान पठाणनेही दिली.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित-विराट कसोटीतून निवृत्ती घेणार? रवी शास्त्रींनी दिले महत्त्वाचे अपडेट, भारतीय कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य

यशस्वी जैस्वालला यानंतर तिसऱ्या पंचांनी वादग्रस्तरित्या बाद घोषित केले. रिव्ह्यूमध्ये यशस्वीच्या बॅट आणि ग्लोव्हज जवळून चेंडू गेला तेव्हा स्निको मीटरवर कोणतीही हालचाल झाली नाही. यानंतरही तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय बदलून यशस्वीला बाद असल्याचे घोषित करण्यात आले आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यशस्वी जैस्वाल बाद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal sam konstas fight later jaiswal shot hit konstas very hard ind vs aus 4th test video viral bdg