After Yashasvi Jaiswal Century create new records: असं म्हणतात की, माणसात जर कौशल्य आणि गुण असतील तर यश आपोआपच त्याच्या पायांशी लोळण घेते. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ही म्हण खरी करून दाखवली आहे. वेस्ट इंडिजच्या भूमीवर, यशस्वीने पदार्पणाच्याच सामन्यात शतक झळकावले आणि तो पराक्रम केला जो सुनील गावसकर आजपर्यंत करू शकला नाही, वीरेंद्र सेहवाग करू शकला नाही, तो २१ वर्षीय यशस्वी जैस्वालने केला. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पणात शानदार कसोटी शतक झळकावत अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले. त्याने भल्याभल्यांना मागे टाकत क्रिकेटमध्ये आपली ‘दादा’ गिरी दाखवून दिली.

यशस्वी जैस्वाल वेस्ट इंडिजच्या भूमीवर अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय सलामीवीर

वास्तविक, पदार्पणाच्या सामन्यातच यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात शतक झळकावून इतिहास रचला. २१ वर्षीय युवा फलंदाजाने भारताबाहेर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. वेस्ट इंडिजमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्यांच्या आधी सुनील गावसकर यांनी १९७१ साली वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण केले होते, परंतु पहिल्या सामन्यात त्यांना शतक झळकावण्यात अपयश आले होते. त्याचवेळी २०११ मध्ये विराट कोहलीनेही विंडीजच्या मैदानावर पदार्पण केले पण त्याला शतकही करता आले नाही.

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
ENG vs SL Joe Root sixth highest run scorer in Test cricket
ENG vs SL Test : जो रुटने कुमार संगकाराला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील सहावा खेळाडू
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Joe root make most test runs at lords cricket ground
Joe root : जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! सर्व फलंदाजांना मागे टाकत लॉर्ड्सवर केली खास कामगिरी
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम

कर्णधार रोहित शर्मानेही कॅरेबियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि आपलेही शतक पूर्ण केले. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ (१३ जुलै) संपेपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात २ बाद ३१२ धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (१४३) आणि विराट कोहली (३६) नाबाद आहेत.

परदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर

परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा यशस्वी पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी सुधीर नाईकने इंग्लंडमध्ये १९७४ मध्ये ७७ धावा केल्या होत्या. तर सुनील गावसकर यांनी पदार्पणाच्या डावात ६५ धावा केल्या. यशस्वीने सर्वांना मागे टाकले आहे. एकंदरीत शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पदार्पणाच्या कसोटीत सलामीवीर म्हणून शतके झळकावली आहेत पण हे शतक मायदेशातील कसोटी मालिकेत आले आहेत.

याशिवाय पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी एकूण भारतीयांपैकी १७वा फलंदाज ठरला आहे. म्हणजेच त्याच्या आधी भारताच्या १६ फलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले आहे. जर आपण सर्वोत्तम धावसंख्येबद्दल बोललो, तर पदार्पणाच्या कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम धवनच्या नावावर आहे, ज्याने मार्च २०१३ मध्ये मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावा केल्या होत्या. तिसर्‍या दिवशीही यशस्वी खेळाला सुरुवात करेल, अशा परिस्थितीत हा विक्रमही मोडू शकतो.

गांगुली, सेहवागच्या यादीत यशस्वी जैस्वालचा लागला नंबर

२१ वर्षीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणातच शतक ठोकून इतिहास रचला. खरे तर फार कमी भारतीय खेळाडूंनी भारताबाहेर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. आता त्या यादीत यशस्वी जैस्वालचेही नाव जोडले गेले आहे. जैस्वालच्या आधी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, अब्बास अली बेग, प्रवीण अमरे आणि सुरिंदर अमरनाथ यांनी ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा जयस्वाल आता सातवा खेळाडू ठरला आहे.

श्रेयस अय्यरने यशस्वीच्या आधीच्या शेवटच्या पदार्पणाच्या कसोटीत भारतासाठी शतक झळकावले. त्याने २०२१ मध्ये कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध १०५ धावा केल्या होत्या. लाला अमरनाथ हे भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे पहिले भारतीय खेळाडू होते. त्यांनी १९३३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या.

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय

१८ वर्षे ३२९ दिवस – पृथ्वी शॉ विरुद्ध वेस्ट इंडिज, राजकोट, २०१८

२० वर्षे १२६ दिवस – अब्बास अली बेग विरुद्ध इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड, १९५९

२० वर्षे २७६ दिवस – गुंडप्पा विश्वनाथ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कानपूर, १९६९

२१ वर्षे १९६ दिवस – यशस्वी जैस्वाल विरुद्ध वेस्ट इंडिज, रॉसिओ, २०२३

२१ वर्षे ३२७ दिवस – मोहम्मद अझरुद्दीन विरुद्ध इंग्लंड, कोलकाता, १९८४

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात भारतीय शतक

११७ – रोहित शर्मा, कोलकाता, २०१३

१३४ – पृथ्वी, राजकोट , २०१८

१४३* धावा – यशस्वी जैस्वाल, रॉसिओ, २०२३

पदार्पण करताच सचिनचा विक्रम मोडला गेला

यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ८०.२१च्या मजबूत सरासरीसह टीम इंडियामध्ये कसोटी पदार्पण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. जेव्हा सचिनने भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी त्याची स्थानिक क्रिकेटमध्ये सरासरी ७०.१८ होती. स्थानिक क्रिकेटमध्ये ८८.३७च्या सरासरीने सर्वाधिक धावा करून कसोटी पदार्पण करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे.

हेही वाचा: IND vs WI: ‘यशस्वी’ भव: जैस्वालचे धडाकेबाज शतक! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय सलामीवीर

पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा भारतीय

शिखर धवन – १८७ धावा

रोहित शर्मा – १७७ धावा

यशस्वी जैस्वाल – १४३* धावा

गुंडप्पा विश्वनाथ – १३७ धावा

पृथ्वी शॉ – १३४ धावा

सौरव गांगुली – १३१ धावा

सुरिंदर अमरनाथ – १२४ धावा

सुरेश रैना – १२० धावा –

लाला अमरनाथ- ११८ धावा

अब्बास अली बेग -११२ धावा

दीपक शोधन – ११० धावा

मोहम्मद अझरुद्दीन – ११० धावा

हनुमंत सिंग – १०५ धावा

वीरेंद्र सेहवाग – १०५ धावा

श्रेयस अय्यर – १०५ धावा

प्रवीण अमरे – १०३ धावा

कृपाल सिंग – १००* धावा