Yashasvi Jaiswal scored his second Test century : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालने श्रेयस अय्यरसह संघाचा डाव सावरला. त्याचबरोबर यशस्वीने दुसरे कसोटी शतक झळकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वी जैस्वालने झळकावले दुसरे कसोटी शतक –

यशस्वी जैस्वालने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक १५१ चेंडूत झळकावले. यशस्वीने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्ध १७१ धावांची खेळी केली होती. आता त्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून आपण भविष्यातील मोठा फलंदाज असल्याचे दाखवून दिले. भारताने २ बाद १७३ धावा केल्या आहेत. यशस्वीसोबत श्रेयस अय्यर क्रीजवर आहे. दोघांमध्ये ८५हून धावांची भागीदारी झाली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या रूपाने भारताला दोन धक्के बसले आहेत.

हेही वाचा – MS Dhoni : मित्राच्या साखरपुड्यात विधी समजावून सांगताना दिसला माही, VIDEO होतोय व्हायरल

वृत्त लिहेपर्यंत त्याने १५८ चेंडूंचा सामना करत १०४धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ३षटकार मारले. यशस्वीच्या शानदार खेळीमुळे भारताने ५१ षटकांत १८० धावा केल्या होत्या. हैदराबादमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडने हा सामना २८ धावांनी जिंकला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वीने ७४ चेंडूंचा सामना करत ८० धावा केल्या होत्या. त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. दुसऱ्या डावात १५ धावा करून यशस्वी बाद झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal scored his second century in the second test match against england vbm