IND vs ZIM 5th T20I Match Updates: भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेत मालिका आपल्या नावे केली आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड यांनी झिम्बाब्वे दौऱ्यावर दमदार कामगिरी केली. आता दोन्ही संघांमध्ये या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना होत आहे. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना भारताच्या यशस्वी जैस्वालने १३ धावा करत मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “तुम्हाला खेळायचंय तर खेळा, आमचा संघ पाकिस्तानात पाठवणार नाही..”, लाइव्ह शोमध्ये हरभजन सिंग भडकला, VIDEO व्हायरल

प्रथम फलंदाजी करताना भारताने संजू सॅमसनच्या अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या आहेत. याशिवाय भारताच्या सर्वच फलंदाजांनी धावसंख्येमध्ये कमी अधिक धावांचे योगदान दिले आहे. शिवम दुबे आणि रिंकू सिंगने अखेरच्या षटकांत मोठे फटके मारत धावा केल्या. यासह झिम्बाब्वेला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम (Yashasvi Jaiswal Record)

नाणेफेक गमावल्यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सलामीसाठी मैदानात आले. जैस्वालने स्ट्राईकची धुरा सांभाळली आणि कर्णधार सिकंदर रझाने झिम्बाब्वेकडून गोलंदाजीला सुरूवात केली. जैस्वालने पहिल्याच चेंडूवर लांबलचक षटकार ठोकला. पण हा चेंडू नो बॉल ठरला. यानंतर सामन्याचा पहिला चेंडू जो फ्रि हिट होता, त्यावरही जैस्वालने षटकार ठोकला. यासह यशस्वी जैस्वाल टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्या कायदेशीर चेंडूवर १३ धावा करणारा संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने दोन षटकारांसह १२ धावा केल्या. याशिवाय नो बॉलमुळे एक धावही जोडली गेली. टी-२० सामन्यातील पहिल्या कायदेशीर चेंडूवर एखाद्या खेळाडूने आपल्या संघासाठी १३ धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…

दोन षटकारांनंतर यशस्वी जैस्वाल जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही आणि पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. तर मागील सामन्यात त्याने दमदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. ९३ धावा करत यशस्वी नाबाद परतला. त्याच्या या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

पाचव्या टी-२० सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन:
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal scores 13 runs on 1st ball of the match in ind vs zim 5th t20i bdg
Show comments