IND vs AUS 5th Test Day 2 Updates in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पाचवा सिडनी कसोटी सामना सध्या खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे जो दिसूनही येत आहे. टीम इंडिया पहिल्या डावात १८५ धावांवर सर्वबाद झाली, पण प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाला १८१ धावांवर सर्वबाद केलं. या सामन्याच्या पहिल्या डावात कॉन्स्टासने बुमराहशी घातलेला वाद आणि त्यानंतर तापलेलं प्रकरण चर्चेचा विषय होता. दुसऱ्या दिवशी मैदानावरही हे दिसून आलं.
या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळाली, पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात बाचाबाची झाली. भारताचा संपूर्ण संघ कॉन्स्टासविरूद्ध उभा ठाकलेला दिसला. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल क्षेत्ररक्षण करताना कॉन्स्टासची चांगलीच फिरकी घेताना दिसला. यशस्वीने कॉन्स्टासला असं काही चिडवलं की जे ऐकून एकच हशा पिकला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराह चालू सामन्यातच सिडनी स्टेडियमबाहेर, टीम डॉक्टरसह का सोडलं मैदान?
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सॅम कॉन्स्टास फलंदाजी करत असताना जैस्वालने त्याची खिल्ली उडवली. जैस्वालने कॉन्स्टसचं नावही नीट घेतलं नाही आणि त्याला चिडवताना दिसला, “काय झालं आता मोठे फटके दिसत नाहीत का, अरे कॉन्टास, आता फटके लागत नाहीयेत का?” असं यशस्वी बोलताना स्टंप माईकवर रेकॉर्ड झाला आहे. यशस्वीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. समालोचन करताना जैस्वालचे हे चिडवणं ऐकून इरफान पठाण आणि जतिन सप्रू देखील खूप हसताना दिसले. पण कॉन्स्टासने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा यशस्वीला प्रत्युत्तरही दिले नाही.
मेलबर्न कसोटीत यशस्वी जैस्वाल फलंदाजी करत असताना कॉन्स्टास सारखं काही ना काही बोलून यशस्वीला त्रास देताना दिसला. यानंतर यशस्वी त्याच्यावर चांगलाच संतापला होता आणि त्यानंतर एक फटका खेळताना कॉन्स्टासला यशस्वीने मारलेला चेंडू लागल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
हेही वाचा – IND vs AUS : प्रसिध कृष्णाचं जबरदस्त कमबॅक! ॲलेक्स कॅरीचा उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल
ग
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला आहे. भारताने १०० धावांच्या आत ४ विकेट्स गमावले आहेत. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने संघाला चांगली सुरूवात करून दिली पण बोलँडच्या भेदक गोलंदाजीवर भारताने पहिले ३ विकेट्स गमावले. सध्या मैदानावर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाची जोडी आहे.