Yashasvi Jaiswal Controversial Wicket in IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून मोठा गदारोळ झाला. या मुद्द्यावर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले. रोहित आणि कमिन्स यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर आपली नाराजी दर्शवली. यशस्वी दोन्ही डावात टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होताना दिसत होते. दुर्दैवाने दुसऱ्या डावात तो वादग्रस्त पद्धतीने आऊट झाला.
जैस्वालच्या विकेटवर राजीव शुक्लाची प्रतिक्रिया –
p
दुसऱ्या डावात ८४ धावांवर खेळत असताना यशस्वी जैस्वालने पॅट कमिन्सच्या लेग साइडमधून बाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याने हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीच्या हातत विसावला. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने झेलबादची जोरदार अपील केली. परंतु, मैदानावरील पंच जोएल विल्सन यांनी जैस्वालला आऊट दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर ‘स्निकोमीटर’वर कोणताही स्पाइक दिसला. त्यानंतरही थर्ड अंपायर शराफुद्दौला यांनी जैस्वालला आऊट दिले. त्यामुळे या वादाला सुरुवात झाली.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष काय म्हणाले?
बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘यशस्वी जैस्वाल स्पष्टपणे नॉट आऊट होता. तांत्रिक संघाकडून आलेल्या सूचनांकडे तिसऱ्या पंचांनी लक्ष द्यायला हवे होते. कारण मैदानावरील पंचाचा निर्णय बदलण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे ठोस कारणे असली पाहिजेत.’
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित कर्णधार नसता तर संघातच नसता…’, हिटमॅनच्या खराब फॉर्मवर इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
तिसरे पंच काय म्हणाले?
यशस्वी जैस्वालच्या विकेट्सचा रिप्ले अनेक कोनातून पाहिला आणि व्हिडिओमधील डिफ्लेक्शन पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी आऊट असल्याचा निर्णय दिला. जैस्वालला आऊट देताना तिसरे पंच म्हणाले, ‘बॉल ग्लोव्हजला स्पर्श करून गेल्याचे मला दिसत आहे. जोएल, तुमचा निर्णय बदलावा लागेल.’ त्यानंतर मैदानावरील पंचांना त्याला आऊट द्यावे लागले.