Yashasvi Jaiswal: देशांतर्गत स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी आणि आयपीएल २०२३मध्ये झंझावाती फलंदाजी करणार स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालची भारतीय संघात निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वी जैस्वालचा प्रथम भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. त्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र, जेव्हा चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले तेव्हा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली. त्याने त्याचे लहानपणीचे किस्से शेअर केले आहेत.

“२१ वर्षीय यशस्वीला संघात ३५ वर्षीय पुजाराच्या जागी देण्यात आल्याने बरेच माजी खेळाडू नाराज झाले. बरं हे जरी बरोबर वाटतं नसलं तरी आता तुम्हाला भविष्याचा संघ तयार करायचा आहे. जर नवीन खेळाडूंना संधी मिळाली नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पूर्ण तयार कसे होणार?” असे मत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

तसे, भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू झाले आहेत ज्यांचे जीवन प्रेरणादायी आहे आणि त्यांनी मोठ्या अडचणींचा सामना करून स्वतःला या स्तरावर स्थापित केले आहे. यशस्वी जैस्वाल देखील अशाच खेळाडूंपैकी एक असून आता त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून यशस्वीचे खरे क्रिकेट करिअर सुरू होणार असून त्याला भविष्यातील महत्त्वाचा खेळाडू असेही म्हटले जाते. जरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली असली तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा: ENG vs AUS: रॉबिन्सन-पाँटिंग स्लेजिंग वादात इंग्लंडच्या माजी कर्णधाराची उडी; म्हणाला, “रिकीचे व्हॉट्सअ‍ॅपवरचे प्रतिसाद…”

यशस्वी जैस्वालची कथा चित्रपटापेक्षा कमी नाही…

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, एकेकाळी यशस्वी जैस्वाल याच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, तो झोपडीत राहत होता. क्रिकेट खेळता-खेळता यशस्वी जैस्वाल पाणीपुरी विकायचा. यानंतर या खेळाडूने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील एका महान फलंदाज होऊ शकतो अशी खेळी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आता तो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र, वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवड झाल्यानंतर यशस्वी जैस्वालचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी एक किस्सा शेअर केला.

हेही वाचा: Sarfaraz Khan: “फक्त धावा केल्याने काही नाही होत त्यासाठी…” सरफराजला BCCIने दिला सूचक इशारा

झाडावर चढून IPL सामना पाहिला तेव्हा…- प्रशिक्षक ज्वाला सिंग

यशस्वी जयस्वालच्या प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी सांगितले की, “एकदा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळला जात होता. हा सामना पाहण्यासाठी यशस्वी जैस्वाल जवळच्या आझाद मैदानाजवळील एका मोठ्या झाडावर चढला, जेणेकरून त्यांना तेथून आयपीएल सामना पाहता येईल.” ज्वाला सिंह सांगतात की, “यानंतर तो मला नेहमी सांगायचा की, एक दिवस मी वानखेडे स्टेडियमवर भारतासाठी सामना खेळेन. मात्र, आता हा खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. याचा मला खूप अभिमान आहे.” याआधी आयपीएल २०२३ च्या मोसमात यशस्वी जैस्वालने उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवले होते.

Story img Loader