Yashasvi Jaiswal Debut India vs West Indies Playing 11: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्माने यापूर्वी प्लेइंग इलेव्हनबाबत खुलासा केला आहे. रोहितने सांगितले की, “यशस्वी जैस्वालचे वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण होणार असून तो सामना खेळणार आहे.” यशस्वीचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याच वेळी, शुबमन गिलच्या बॅटिंग ऑर्डरबद्दल देखील तो बोलला. रोहितने सांगितले की, “टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकी गोलंदाज ठेवले जातील.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम सामन्यात जैस्वाल स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २१ वर्षीय जैस्वाल व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे.

टीम इंडियाला नवा सलामीवीर मिळेल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहितने खुलासा केला की युवा यशस्वी जैस्वाल त्याच्यासोबत सलामीला येईल. चेतेश्वर पुजाराच्या जागी जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल अशी अपेक्षा होती, पण आता हा खेळाडू कर्णधार रोहितसोबत डावाची सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळणार आहे. आतापर्यंत गिल रोहितसोबत कसोटीत ओपनिंग करायचा.

हेही वाचा: Gautam Gambhir: गंभीर लखनऊची साथ सोडणार? ऑस्ट्रेलियाला टी२० चॅम्पियन बनवणारा दिग्गज टीमचा होऊ शकतो नवा प्रशिक्षक

जैस्वालचा रेकॉर्ड उत्कृष्ट ठरला आहे

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जैस्वालची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. अलीकडेच, जैस्वालने इराणी ट्रॉफी दरम्यान मध्य प्रदेश विरुद्ध शेष भारताकडून खेळताना २१३ आणि १४४ धावांची शानदार खेळी खेळली. जैस्वाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियासोबत स्टँडबाय खेळाडू म्हणून इंग्लंडलाही गेला होता. जैस्वालने यंदाच्या आयपीएलमध्येही ६२५ धावा केल्या आहेत.

यशस्वीने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या २६ डावांमध्ये १८४५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने द्विशतक झळकावले आहे. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या २६५ धावा आहे. यशस्वीने ९ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत. त्याने ३२ लिस्ट ए सामन्यात १५११ धावा केल्या आहेत. त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके केली आहेत. यशस्वीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार कामगिरी केली. त्याने ५७ टी२० सामन्यात १५७८ धावा केल्या आहेत.

दोन फिरकीपटूंना मैदानात उतरवण्याची योजना करा

याशिवाय कर्णधार रोहित शर्माने असेही सांगितले की, “पहिल्या कसोटीत टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ही फिरकी जोडी भारताकडून खेळताना दिसू शकते. त्याचबरोबर तीन वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

हेही वाचा: IND vs WI: रात्रीस खेळ चाले! विंडीज विरुद्धचे सामने पाहण्यासाठी करावे लागणार जागरण; सामना कधी, कुठे होणार? जाणून घ्या

भारत आणि वेस्ट इंडीज दोन्ही संघातील खेळाडू:

वेस्ट इंडिज संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझ, तागेतारीन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रीफर, केमार वॉर्मल रोच

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रीकर भारत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal will debut rohit sharma confirmed shubman gill will now play at this number avw
Show comments