IND vs AUS 1st Test Day 2 Highlights in Marathi: पर्थ कसोटीतील पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद होणाऱ्या भारतीय संघाच्या सलामी जोडीने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता उत्कृष्ट १७२ धावांची खेळी केली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी १०४ धावांवर ऑस्ट्रेलियाला ऑल आउट करत ४६ धावांची आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या आहेत आणि यासह भारताने २१८ धावांची आघाडी मिळवली आहे. केएल राहुल ६२ धावा तर यशस्वी जैस्वाल ९० धावांवर खेळत आहेत. दोघांनीही भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट १७२ धावांची भागीदारी रचली आहे.
पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान त्यांने दोन षटकार लगावत एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. यशस्वी जैस्वाल आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी ही कामगिरी फक्त न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमच्या नावे होती.
हेही वाचा – IND vs AUS: “तू खूप स्लो बॉलिंग…’, यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला डिवचत झळकावलं शानदार अर्धशतक, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी यशस्वी जैस्वालच्या नावे कसोटी मध्ये एकूण ३२ षटकार होते. पर्थ कसोटीतील दुसऱ्या डावात दोन षटकार लगावत त्याने ३४ षटकारांचा आकडा पार केला आहे. या सह जैस्वाल एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ब्रँडन मॅक्युलमने एका कॅलेंडर वर्षात ३३ षटकार लगावले होते.
ब
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लगावणारे टॉप पाच फलंदाज
३४ – यशस्वी जयस्वाल – २०२४
३३- ब्रँड अँड मॅक्युलम – २०१४
२६ – बेन स्टोक्स – २०२२
२२- एडम गिलकरेस्ट – २००५
२२- वीरेंद्र सेहवाग – २०८
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका चक्रात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही यशस्वी जैस्वालने केला आहे. या यादीत त्याने बेन स्टोक्सला मागे टाकलं आहे.
ॉ
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका यादीत सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
यशस्वी जैस्वाल – ३२ – २०२३-२५
बेन स्टोक्स – ३१ – २०१९-२१
बेन स्टोक्स – २८ – २०२१-२३
रोहित शर्मा – २७ – २०१९-२१
ऋषभ पंत – २२ – २०२१-२३
बेन स्टोक्स – २२- २०२३-२५