भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे ६६व्या वर्षी हद्रयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळलेल्या १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे ते सदस्य होते. त्यांनी ३७ एकदिवसीय आणि ४२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७९ ते १९८३ मध्ये ते भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज होते. त्यांनी काही वर्षे राष्ट्रीय निवड समितीतही काम केले.

यशपाल शर्मा यांच्या निधनानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा – सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाविरुद्ध झाली मोठी कारवाई!

१९८३च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा ते क्रीजवर आले तेव्हा संघाची धावसंख्या ३ बाद ७६ अशी होती, त्यानंतर भारताने ५ बाद १४१ अशी मजल मारली. शर्मा यांनी १२० चेंडूंत ८९ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक ४० धावा असोत किंवा कठीण परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध ६१ धावांची खेळी, शर्मा यांनी भारताला नेहमीच तारले. शर्मा यांनी या स्पर्धेत ३४.२८च्या सरासरीने २४० धावा केल्या.