सायबर बुलिंग किंवा सोशल मीडिया ट्रोलिंगचा ट्रेंड आजकाल खूप वाढला आहे. सेलिब्रिटींना सर्वाधिक टार्गेट केले जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्टार स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनला एका यूजरने ट्रोल केले होते. मात्र, त्यांनी या ट्रोलरला चोख प्रत्युत्तर दिले. यापूर्वी भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागर, युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही ट्रोलरवर निशाणा साधला आहे. पण हे ट्रोलर्स मान्य करण्याचे नाव घेत नाहीत. यावेळी एका ट्रोलरने भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू यास्तिका भाटियावर कमेंट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी, १४ नोव्हेंबर रोजी एका ट्रोलरने महिला क्रिकेटर यास्तिका भाटियाला टी-२० क्रिकेट खेळू नये, असे ट्विट केले होते. दक्षिण विभागाविरुद्ध चालू असलेल्या वरिष्ठ महिला आंतर विभागीय टी-२० ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पश्चिम विभागाचे नेतृत्व करणाऱ्या यास्तिका भाटिया शांत न बसता ट्रोलला सडेतोड उत्तर दिले आहे.

या ट्रोलरने ट्विट केले की, ‘अग ताई… टी-२० खेळू नकोस.’ यावर उत्तर देताना यास्तिकाने लिहिले, ‘मग मी तुझ्याप्रमाणे घरी बसून कमेंट पास करू का?’ यास्तिकाच्या या ट्विटचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तिच्या समर्थनार्थ चाहतेही या ट्रोलला खूप क्लास घेत आहेत.

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पासून, यास्तिका भारतीय महिला टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा भाग नाही. यास्तिका इंग्लंडच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये बॅकअप यष्टिरक्षक होती, परंतु टी-२० आंतरराष्ट्रीय आणि त्यानंतर आशिया चषकासाठी तिला संघाबाहेर ठेवण्यात आले. मात्र, उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात ५५ चेंडूत ६४ धावा करणे यास्तिकासाठी चांगले ठरेल. ऑस्ट्रेलियन मालिका, दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा – IND vs NZ Series: टी-२० मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू वेलिंग्टन बीचवर करत आहेत मस्ती, पाहा व्हिडिओ

१२४ धावांचा पाठलाग करताना यस्तिकाच्या अर्धशतकी खेळीनंतरही वेस्ट इंडिज ८ बाद १०६ धावांवर संकटात सापडला होता. मात्र, नेहा चावडाने ८ चेंडूत नाबाद १६ धावा करत पश्चिम विभागाला चांगली साथ दिली. तिच्या दमदार कामगिरीमुळए तिच्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. टी-२० ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पश्चिम विभागाचा सामना मध्य विभागाशी होईल, जे उपांत्य फेरीत उत्तर विभागाचा पराभव करून मैदानात उतरतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yasthika bhatia gave a bitter reply to the troller and said so will i sit at home and pass comments like you vbm