महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. या स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले. सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम गोलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या. त्याचबबरोबर भारतीय संघासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले. या दरम्यान यास्तिका भाटियाकडून शानदार क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले.

बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत नाबाद ८१ धावांची भागीदारी केली. बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तिने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची नाबाद तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत तिने दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Smriti Mandhana World Record Most Runs in Calendar Year in Woman Cricket INDW vs WIW
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा विश्वविक्रम, २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज
West Indies defeated by Indian women team sports news
भारतीय महिला संघाकडून विंडीजचा धुव्वा
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास

या सामन्यात भारतीय महिला खेळाडू यास्तिका भाटियाने शानदार क्षेत्ररक्षण केले. १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आयेशाने शानदार शॉट खेळला होता. त्यामुळे हा चेंडू सीमापार जाणार असे सर्वांना वाटत होते, परंतु यास्तिका भाटियाने धावत जाऊन डायव्ह मारुन हा चेंडू अडवला. ज्यामुळे दोन धावा वाचवल्या. त्यानंतर इतर भारतीय महिला संघाकडून मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले. त्याचा फायदा पाकिस्तान संघाने उचलला.

पाकिस्तान महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): जावेरिया खान, मुनीबा अली (डब्ल्यू), बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल

भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग

Story img Loader