महिला प्रीमियर लीगमधील १५वा सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद १२७ धावा केल्या. त्याचबरोबर यूपी वॉरियर्स संघापुढे १२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु या सामन्यात यस्तिका भाटिया चर्चेचा विषय ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात आज मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर यस्तिका भाटिया अवघ्या सात धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला अंजली सरवणीने क्लीन बोल्ड केले. तत्पुर्वी हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी पहिल्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली.

सूर्यासारखा शॉट मारण्याच्या नादात बोल्ड –

यास्तिका भाटियाकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ती अवघ्या सात धावांवर बाद झाली. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यस्तिकाने माघारी फिरून सूर्यकुमार यादवच्या शैलीत स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण ती चेंडूची लाईन पूर्णपणे चुकली. त्यामुळे यास्तिका क्लीन बोल्ड झाली. यास्तिका बाद झाल्यामुळे संघ दडपणाखाली आला. तिचा क्लीन बोल्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यानंतर फॉर्मात असलेली फलंदाज नॅट सीव्हर ब्रंट काही विशेष करू शकली नाही. तिला पाच धावांवर एक्लेस्टोनने एलबीडब्ल्यू आऊट केले. हेली मॅथ्यूजनेही धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तिची विकेट गमावली. तिला ३० चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३५ धावा करता आल्या.

कर्णधार हरमनप्रीत कौर २२ चेंडूत २५ धावा करून बाद झाली. अमेलिया कार काही विशेष करू शकली नाही आणि तीन धावा करून बाद झाली. अमनजोत कौर (५), हुमैरा काझी (४), धारा गुर्जर (३) आणि सायका इशाक (०) हेही झटपट बाद झाले. मुंबईच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

हेही वाचा –IPL 2023: आरसीबीला मिळाला विल जॅकचा बदली खेळाडू; न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची केली निवड

इस्‍सी वाँगने १९ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३२ धावांची तुफानी खेळी केली. २०व्या षटकात मुंबईच्या दोन विकेट पडल्या. या षटकात इस्सी वाँग आणि सायका धावबाद झाले. यूपी संघाकडून सोफी एक्लेस्टोनशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी अंजली सरवणीला एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yastika bhatia was clean bowled while playing a sweep shot like suryakumar vbm