बांगलादेशविरुद्धच्या मिरपूर एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाने सातत्यपूर्ण आक्रमणाचा दृष्टिकोन स्वीकारला आणि परिस्थितीनुसार खेळ केला नाही, असे त्याने म्हटले आहे. त्यांच्या मते, खेळाडूंनी खेळाचा आदर केला नाही, तर त्यांच्यासोबत पुन्हा असे होऊ शकते.
बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एका विकेटने पराभव केला. प्रथम खेळताना भारताने ४१.२ षटकांत केवळ १८६ धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने ४६ षटकांत ९ गडी गमावून विजय मिळवला. एकेकाळी बांगलादेशने १३६ धावांत ९ विकेट गमावल्या होत्या आणि टीम इंडिया आता हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र, १०व्या विकेटसाठी बांगलादेशचे फलंदाज मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिझूर रहमान यांनी नाबाद ५१ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
‘ते काय फक्त लग्नाची वरात गोळा करत आहेत का?’
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा म्हणाला, “भारतीय संघात अनेक खेळाडूंना एकामागून एक खेळाडूला संधी देत एकामागोमाग एक प्रयोग केले जात आहेत. रोटेशन पॉलीसीच्या नावाखाली हे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. टीम इंडियात एखाद्या क्रिकेटपटूला संधी दिली तर त्याला तीन सामन्यांनंतर बाहेरचा रस्ता दाखवणे ही चांगली गोष्ट कितपत योग्य आहे याचा विचार संघ व्यवस्थापनाने करणे गरजेचे आहे. असे करून तुम्ही फक्त लग्नाची वरात गोळा करत आहात.” अशा तीव्र शब्दात त्याने टीम इंडियाच्या धोरणांवर टीका केली आहे.
अजय जडेजाने सोनी स्पोर्ट्स सोबत बोलताना सांगितले की “आजकाल अर्धांगवायू झाल्यासारखे विश्लेषण केले जात आहे. जर तुम्ही विश्वचषकापूर्वी ठरवले की तुम्ही कसे खेळायचे, तर आजच्या परिस्थितीत सारखे होईल. तुम्ही बाहेर पडाल, तुमच्या चुका होतील, पण एकदिवस ते नक्की साध्य होईल. जर तुम्ही ५० षटके लढत बाद झाला असता तर गोष्ट वेगळी होती.”
जडेजा पुढे म्हणतात की, “ बांगलादेशची गोलंदाजी खूप चांगली होती. पण असे नाही की एखाद्या गोलंदाजाने तुम्हालाच बाद केले. तुम्ही कधीच बचावात्मक पवित्र्यात गेला नाही. तुम्ही कायम आक्रमणाच्या पवित्र्यामध्ये होतात आणि तुमच्या तळातील फलंदाजांना २०% देखील खेळायला सोडले नाही. तुम्ही कसे खेळायचे हे आधीच ठरवले आहे परंतु हा खेळ इतका सोपा नाही, तुम्हाला दररोज त्याचा आदर करावा लागेल. या खेळाची खासियत आहे की परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पडते.”
जडेजा यांनी निराशा व्यक्त करत म्हटले की, “म्हणूनच थोडी अधिक निराशा झाली आहे. ते बाद होण्याची ही पहिली किंवा शेवटची वेळ नाही, बचाव करताना तुम्ही १० षटके लवकर बाद झाले असती तर समजू शकलो असतो, पण तुम्ही आक्रमक स्थितीत असाल आणि १५ षटके सोडली असती तर.कुठेतरी खेळात नाही तर त्यांच्या विचारात कमतरता होती.”