Top 10 Batsmen of 2023 T20I : चालू वर्ष म्हणजेच २०२३ अखेरच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे वर्ष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक फलंदाजांसाठी चांगले होते, ज्यामध्ये भारताच्या सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षांच्या धर्तीवर यंदाही सूर्याने टी-२० मध्ये अप्रतिम कामगिरी केली. जरी तो फॉरमॅटमध्ये हाय स्कोअरर नसला, तरी तो आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे.

सूर्याने या वर्षातील शेवटचा टी-२० सामना गुरुवारी (१४ डिसेंबर) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात सूर्याने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील चौथे शतक झळकावले. या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये कोणत्या १० फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले ते जाणून घेऊया.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

यूएईच्या मोहम्मद वसीमने या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. वसीमने २१ सामन्यांच्या २१ डावात ४०.३० च्या सरासरीने आणि १६३.१५ च्या स्ट्राईक रेटने ८०६ धावा केल्या. या कालावधीत त्याच्या बॅटमधून एकूण ६ अर्धशतके झाली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ९१ होती. दरम्यान, वसीमने ७४ चौकार आणि ५१ षटकार मारले.

हेही वाचा – IPL 2024 : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार; नव्या हंगामापूर्वी मोठी घोषणा

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने यावर्षी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १८ सामन्यांच्या १७ डावांमध्ये ४५.२१ च्या सरासरीने आणि १५२.८९ च्या स्ट्राइक रेटने ७३३ धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली. या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव हा एकमेव भारतीय आहे. पदार्पणापासूनच सूर्या आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सतत आपली छाप पाडत आहे. २०२१ मध्ये त्याने टी-२० मध्ये पदार्पण केले.

२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

मोहम्मद वसीम (यूएई) – ८०६ धावा
सूर्यकुमार यादव (भारत)- ७३३
सायमन सेसाजी (युगांडा) – ६७१ धावा
विरनदीप सिंग (मलेशिया) – ६६५ धावा
रॉजर मुकासा (युगांडा) – ६५८ धावा
सय्यद अझीझ (मलेशिया) – ५५९ धावा
मार्क चॅम्पमन (न्यूझीलंड) – ५५६ धावा
कॉलिन्स ओबुया (केनिया) – ५४९ धावा
कॅमू लॅव्हरॉक (बरमुडा) – ५२५ धावा
सिकंदर रझा (झिम्बाब्वे) – ५१५ धावा.