Virat Kohli most century international cricket in this year : आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या फायनलमधील पराभव वगळता, हे वर्ष भारतीय संघासाठी खूप चांगले होते. २०२३ मध्ये भारताच्या ९ फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके ठोकली. यापैकी भारतीय फलंदाजांनी वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. या वर्षी भारताच्या ६ फलंदाजांनी वनडेत शतकी खेळी खेळली. हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. या वर्षी, विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅट एकत्र करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू होता. युवा सलामीवीर शुबमन गिलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

३५ वर्षीय विराट कोहलीने यावर्षी ८ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. या काळात विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ शतके झळकावली. वनडे विश्वचषकात यापैकी ३ शतके झळकावली. बॉक्सिंग डे कसोटी वगळता विराट कोहलीने यावर्षी ३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आठ शतके झळकावली. या यादीत युवा सलामीवीर शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. गिलने या वर्षी ७ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली, ज्यात वनडेतील ५ शतकांचा समावेश आहे. गिलची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या २०८ धावा आहे, जी त्याने यावर्षी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध केली होती. बॉक्सिंग डे कसोटी वगळता, गिलने यावर्षी ४७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावली.

रोहित शर्माने झळकावली ४ शतके –

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतके झळकावली आहेत. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही शतके झळकावली. श्रेयस अय्यरनेही या वर्षी ३ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. अय्यरने यावर्षी २० एकदिवसीय सामन्यांमध्ये हे शतक केले. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने दोन शतके झळकावली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी समान २-२ शतके झळकावली. सूर्याने यावर्षी ४० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, तर बॉक्सिंग डेपूर्वी केएल राहुलने २९ सामने आणि यशस्वी जैस्वालने १७ सामन्यांमध्ये भाग घेतला.

हेही वाचा – IND vs SA 1st Test: “भारताला अजून…” पहिल्या दिवसाच्या खेळानंतर सुनील गावसकरांनी टीम इंडियाला दिला मोलाचा सल्ला

केएल राहुलने झळकावली २ शतके –

केएल राहुलने यावर्षी २ शतके झळकावली आहेत. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी, राहुलने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध भारतीय म्हणून सर्वात जलद शतक झळकावले होते. राहुलने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या वर्षी सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनीही प्रत्येकी शतक झळकावले.

Story img Loader