Sarah Taylor’s response to critics: इंग्लंडची माजी यष्टीरक्षक सारा टेलरने तिची जोडीदार डायना गरोदर असल्याची सोशल माडियावर जाहीर केले होते. यानंतर लोकांनी या कपलला ट्रोल करायला सुरुवात केली. तेव्हा पासून काही लोकं लोक तिला लेस्बियन असल्यानं ट्रोल करत आहेत. आता आशा ट्रोलर्सना साराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. साराने सांगितले की, मी लेस्बियन आहे आणि मी आनंदी आहे. तिने सोशल मीडियावरुन आपल्या टिकाकारांना प्रत्युत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिने ट्विटमध्ये लिहिले, माझ्या जोडीदाराच्या गर्भधारणेची घोषणा करताना मी वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती, याचा मला अंदाज नव्हता. आशा आहे की मी काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन. तिने पुढे लिहिले, आयव्हीएफ एका अज्ञात व्यक्तीकडून शुक्राणू दान केले. ज्याला इतरांना एक अतिशय अनोखी संधी द्यायची आहे. या अगोदर सारा सोशल मीडियावर कोहलीला लग्नासाठी प्रपोज केल्याने चर्चेत आली होती.

३० वर्षीय माजी क्रिकेटरने लिहिले, होय, मी समलैंगिक आहे आणि खूप दिवसांपासून आहे. नाही, हा पर्याय नाही. मी प्रेमात आहे आणि आनंदी आहे, हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक कुटुंब वेगळे असते… ते कसे कार्य करते आणि ते कसे दिसते. प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःला शिक्षित करा. मुलाचे प्रेम आणि समर्थन मिळेल.

तिने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले, ”आम्ही सर्व वेगवेगळ्या विश्वासांसह वेगवेगळ्या प्रकारे वाढले आहोत. मी इतरांवर निर्णय देत नाही. तथापि, मी द्वेष, उपहास आणि गैरवर्तन यावर निर्णय देईन. तुम्ही इथले नाहीत. जोपर्यंत तुम्ही आनंदी आहात तोपर्यंत तुम्हाला पाहिजे त्याच्यावर प्रेम करा. प्रेम आणि समर्थन देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.

सारा टेलर एक दिग्गज खेळाडू –

इंग्लंडची यष्टिरक्षक फलंदाज सारा टेलरने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. ती महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. ती तीन वेळा आयसीसी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ती इंग्लंडच्या एकदिवसीय विश्वचषक २०१७ आणि टी-२० विश्वचषक २००९ च्या विजेत्या संघाचा देखील एक भाग आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes i am a lesbian sarah taylor gave a sharp reply to the critics vbm