Yogesh Kathuniya won silver medal for India in f56 discuss throw final : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेच्या पाचव्या दिवशी योगेश कथुनिया याने भारतासाठी आठवे पदक जिंकले. योगेश कथुनिया पुरुषांच्या डिस्कस थ्रो F-56 स्पर्धेत या खेळात रौप्य पदक पटकावले आहे. योगेशने त्याच्या हंगामातील सर्वोत्तम ४२.२२ मीटर थ्रोसह रौप्यपदक जिंकले. या पदकासह भारताला पदकतालिकेत फायदा झाला आहे. आता आपण योगेश कथुनिया कोण आहे आणि त्याला अपंगत्व कसे आले? याबद्दल जाणून घेऊया.

डिस्कस थ्रोअर योगेश कथुनियाच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावे, पण वयाच्या ९व्या वर्षी जेव्हा तो एका उद्यानात पडला आणि उभा राहू शकला नाही तेव्हा त्याला एक मोठा आजार झाल्याचे निदान झाले. योगेशला गुइलेन-बॅरे सिंड्रोम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
India Beat Sri Lanka by 7 Wickets in Semifinal and Enters Final of U19 Asia Cup
IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?

योगेश कथुनियाचे पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसरे पदक –

त्यामुळे शरीराच्या हालचालींवर परिणाम होऊन स्नायू कमकुवत होतात. यानंतर योगेशच्या पालकांना वाटले होते की त्यांचा मुलगा कदाचित पुन्हा कधीही चालू शकणार नाही, परंतु फिजिओथेरपीसह अनेक वर्षांच्या उपचारानंतर तो क्रॅचच्या मदतीने उभा राहू लागला. आता २७ वर्षीय योगेशने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून आपला संयम आणि लढाऊपणा सिद्ध केला आहे.

हेही वाचा – Yogesh Kathuniya: भारताच्या योगेश कथुनियाचा बेस्ट थ्रो अन् पटकावलं सलग दुसरं पॅरालिम्पिक रौप्यपदक

उद्यानात पडल्यानंतर अर्धांगवायू झाल्यासारखे वाटले –

योगेशचे वडील, भारतीय लष्करातील निवृत्त कॅप्टन ज्ञानचंद म्हणाले, “योगेश हा खूप अभ्यासू मुलगा होता आणि त्याने डॉक्टर व्हावे अशी आमची इच्छा होती. पण एके दिवशी तो उद्यानात खेळताना पडला आणि त्याला अर्धांगवायू झाल्यासारखे वाटले. जेव्हा आम्ही त्याला कमांड हॉस्पिटलमध्ये नेले, तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला गुइलेन-बॅरे सिंड्रोमबद्दल सांगितले. आम्हाला याबद्दल काहीही माहिती नव्हते, परंतु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तो पुन्हा कधीही चालणार नाही. त्याने पॅरालिम्पिक स्पर्धेत जिंकलेल्या पदकांचे श्रेय त्याच्या आईच्या जिद्दीला आणि योगेशच्या इच्छाशक्ती जाते.”

हेही वाचा – Yograj Singh on MS Dhoni : ‘धोनीने आरशात तोंड पाहावे…’, योगराज सिंगांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘युवराजला भारतरत्न द्यावा…’

F56 श्रेणीत खेळाडू बसून स्पर्धा करतात –

योगेश कथुनियाने F56 प्रकारात ४२.२२ मीटर अंतरापर्यंत डिस्कस फेकून रौप्य पदक जिंकले. ही एक अशी श्रेणी आहे, ज्यामध्ये खेळाडू बसून स्पर्धा करतात. कथुनिया कुटुंबीय योगेशला त्यांच्या बल्लभगड येथील घरातून जागतिक स्तरावर प्रगती करताना पाहत होते. तीन वर्षांपूर्वी त्याने टोकियोमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

Story img Loader