Paris Paralympics 2024 Yogesh Kathuniya won Silver: भारताच्या योगेश कथुनिया याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये डिस्कस थ्रो या खेळात रौप्य पदक पटकावले आहे. योगेश कथुनिया पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F-56 स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकांची संख्या आठवर नेली. योगेशने त्याच्या हंगामातील सर्वोत्तम ४२.२२ मीटर थ्रोसह रौप्यपदक जिंकले. या पदकासह भारताला पदकतालिकेत फायदा झाला आहे. योगेशने भारताकडून दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि पुन्हा एकदा यशाची पुनरावृत्ती केली. योगेशने टोकियो पॅरालिम्पिक गेम्स २०२१ मध्येही भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.
डिस्कस थ्रोअर योगेश कथुनियाच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावे, परंतु नशिबात मात्र वेगळेच होते. योगेश व९ वर्षांचा असताना एकदा गार्डनमध्ये पडला आणि उभाच राहू शकला नाही. डॉक्टरांनी सांगितले की त्याला गुइलेन-बॅरे सिंड्रोम आहे, एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ज्यामुळे शरीराच्या हालचालीत अडथळा येतो आणि परिणामी स्नायू कमकुवत होतात. त्याला पुन्हा चालता येणार नाही, असे त्यांना वाटले. पण फिजिओथेरपीसह अनेक वर्षांच्या उपचारानंतर तो क्रॅच वापरून उभा राहू शकला.
पॅरालिम्पिक विक्रम मोडला
योगेशला ब्राझीलच्या क्लॉडिन बतिस्ता डॉस सँटोसकडून अटीतटीच्या स्पर्धेचा सामना करावा लागला आणि ब्राझील खेळाडूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सुवर्णपदक जिंकण्यात मदत झाली. बतिस्ताने ४६.४५ मीटरच्या दुसऱ्या थ्रोसह सर्वकालीन पॅरालिम्पिक विक्रम (४५.५९ मी) मोडला. मात्र, तो एवढ्यावरच थांबला नाही आणि त्याने ५व्या प्रयत्नात ४६.८६ मीटर अंतर गाठून नवा पॅरालिम्पिक विक्रम रचला. पॅरिसमधील हे यश बतिस्ताच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठे यश आहे.
हेही वाचा – Farhan Ahmed: इंग्लंडच्या १६ वर्षीय खेळाडूने मोडला १५९ वर्षे जुना विक्रम, एकाच सामन्यात घेतले १० विकेट्स
कोण आहे योगेश कथुनिया?
योगेश कथुनियाचा जन्म ४ मार्च १९९७ रोजी बहादूरगड येथे झाला. त्याचे वडील भारतीय सैन्यात होते तर आई गृहिणी होती. योगेश वयाच्या ९व्या वर्षी गुइलेन-बॅरे सिंड्रोम त्याला झाला. त्याने इंडियन आर्मी पब्लिक स्कूल, चंदीगड येथे शिक्षण घेतले, जिथे त्याचे वडील चंडीमंदिर छावणी येथे तैनात होते. त्याच्या आईने फिजिओथेरपीचे शिक्षण घेतले आणि ३ वर्षातच त्यांनी योगेशला पुन्हा चालण्यास सक्षम केले. योगेशने नंतर दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि वाणिज्य शाखेतून पदवी घेतली.
२०१६ मध्ये, किरोडीमाल कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस सचिन यादव यांनी पॅरा ऍथलीट्सचे व्हिडिओ दाखवून त्याला खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरित केल्यानंतर, कथुनियाने पॅरा स्पोर्ट्समध्ये प्रवेश घेतला. २०१८ मध्ये, त्याने बर्लिन येथे २०१८ वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये ४५.१८ मीटर डिस्कस थ्रो फेकून F36 प्रकारात विश्वविक्रम प्रस्थापित केला. कथुनियाने २०२० पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि रौप्य पदक जिंकले. नोव्हेंबर २०२१ मध्ये, भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी २०२० उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल कथुनियाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.
© IE Online Media Services (P) Ltd