रेल्वेचा अष्टपैलू योगेश मोरे याने राष्ट्रीय स्तरावरील पुरुष गटाचा सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार मिळविला. महिलांमध्ये महाराष्ट्राची कर्णधार प्रियंका येळे हिने राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचा मान मिळविला. प्रियंका येळे हिला यापूर्वी १४ वर्षांखालील गटाचा इला पुरस्कार व १८ वर्षांखालील गटाचा जानकी पुरस्कार मिळाला आहे. महिलांमध्ये सवरेत्कृष्ट आक्रमक खेळाडूचे पारितोषिक शिल्पा जाधव (महाराष्ट्र) तर संरक्षक म्हणून आर.राधिका (केरळ) यांना देण्यात आले. पुरुषांमध्ये सवरेत्कृष्ट आक्रमक व संरक्षक म्हणून पी.अनंतकुमार (रेल्वे) व नरेश सावंत (महाराष्ट्र) यांची निवड झाली.
योगेश मोरेला एकलव्य तर प्रियंका येळे राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची मानकरी
रेल्वेचा अष्टपैलू योगेश मोरे याने राष्ट्रीय स्तरावरील पुरुष गटाचा सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार मिळविला. महिलांमध्ये महाराष्ट्राची कर्णधार प्रियंका येळे हिने राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचा मान मिळविला. प्रियंका येळे हिला यापूर्वी १४ वर्षांखालील गटाचा इला पुरस्कार व १८ वर्षांखालील गटाचा जानकी पुरस्कार मिळाला आहे.
First published on: 13-12-2012 at 04:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogesh more got eklavya and priyanka yele got rani laxmibai award