लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त आणि महाराष्ट्र केसरी विजेता नरसिंग यादव यांची आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा लास व्हेगास (अमेरिका) येथे ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघातर्फे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. ७४ किलो गटांत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशील कुमारने दुखापतीमुळे माघार घेतली असल्यामुळे त्याच्याऐवजी नरसिंगला संधी मिळाली आहे. त्याने चाचणीत प्रवीण राणावर ६-५ अशा गुणांनी मात केली.
योगेश्वरला ६५ किलो फ्रीस्टाइल गटातील पहिल्या लढतीत पुढे चाल मिळाली, मात्र नंतरच्या लढतीत त्याला अमितकुमार धानखरविरुद्ध विजय मिळवताना झुंजावे लागले. सहा मिनिटे चाललेली ही लढत ६-३ अशी जिंकून योगेश्वरने जागतिक स्पर्धेतील स्थान निश्चित केले.
चाचणीमधील ५७ किलो गटांत अमितकुमारने संदीप तोमरला ३-२ असे हरविले. सुरुवातीस तो १-२ असा पिछाडीवर होता. नरेश कुमार (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) व सुमितकुमार (१२५ किलो) यांनीही भारतीय संघात स्थान मिळवले.
सोनू (६१ किलो) व अरुण (७० किलो) यांचीही जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र त्यांच्या गटांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही. सोनू याने प्रदीप कुमार याला ३-२ असे पराभूत केले तर अरुण याला मनोज कुमार याच्याकडून पुढे चाल मिळाली. नरेश कुमारने गोपाळ यादव याचा ७-३ असा पराभव केला तर खत्रीने सत्यव्रत काडियन याचा ६-० असा दारुण पराभव केला. सुमितने कृष्णन याला २-० असे हरवले.
जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी योगेश्वर, नरसिंगची निवड
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त आणि महाराष्ट्र केसरी विजेता नरसिंग यादव यांची आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-07-2015 at 05:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogeshwar dutt narsingh yadav book world championships berths