Yograj Singh Criticized Kapil Dev: युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांची नुकतीच एक मुलाखत समोर आली आहे, ज्यामध्ये ते भारताचे दोन दिग्गज कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी यांच्याबाबत तिखट शब्दात वक्तव्य करताना दिसत आहेत. योगराज यांनी धोनीवर नेहमीच वक्तव्य केले आहे, मात्र यावेळी त्यांनी कपिल देव यांचे नाव घेऊन आपला राग काढला आहे.
झी स्विच यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग युवराज सिंगने क्रिकेटपटू होण्यासाठी केलेल्या मेहनतीबद्दल बोलताना दिसत आहे. त्याने सांगितले की, आपल्या मुलाला मोठा क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईला गावी पाठवले आणि पत्नीला घरातून हाकलून दिले. जर त्यांची पत्नी युवराज सिंगला घेऊन गेली तर ते पुन्हा दुसरे लग्न करू शकतील आणि त्यांना दुसरा मुलगा होईल आणि त्याला क्रिकेटर बनवू शकाव, असेही योगराज यांना काहींनी सांगितले. योगराज यांना युवराज नेमका काय आहे हे जगाला दाखवायचे होते. या संवादादरम्यान त्यांनी कपिल देव यांच्यावरही राग काढला.
Yograj Singh: “धोनीमुळे युवराजने लवकर निवृत्ती घेतली…”, वडिल योगराज सिंग यांचा गौप्यस्फोट
योगराज सिंह म्हणाले, “मला आयुष्यात काही लोकांना दाखवायचे आहे की, योगराज सिंग नेमका काय आहे. ज्याला त्या लोकांनी खाली खेचले. आज संपूर्ण जग माझ्या पायाशी उभे आहे, मला सलाम करत आहे आणि ज्या लोकांनी माझ्याबरोबर वाईट केले होते… काहींना कॅन्सर झाला आहे, काहींचे घर गेले आहे, काहींना त्यांचा मुलगा गमवावा लागला आहे आणि मी कोणाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला माहिती आहे… तो माणूस म्हणजे आमच्या काळातील सर्वकालीन सर्वात महान कर्णधार कपिल देव आहे, मी त्याला सांगितले होते की तुझी अशी अवस्था करेन की सारं जग त्याला वाईट बोलेल… आज युवराज सिंगकडे १३ ट्रॉफी आहेत आणि तुझ्याकडे फक्त एक विश्वचषक आहे.”
कपिल देव यांच्याबरोबर धोनीला ही त्यांनी बरंच काही सुनावलं. धोनी एक महान कर्णधार होता पण त्याच्यामुळे युवराज सिंगचं करियर खराब झालं आणि त्याने लवकर निवृत्ती घेतली. नाहीतर युवराज सिंग अजून ४-५ वर्ष नक्कीच क्रिकेट खेळू शकला असता असं युुवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी या मुलाखतीत सांगितले.