Yuvraj Singh Father Yograj Singh Shares Childhood Incident: योगराज सिंग हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत आणि युवराज सिंगचे वडीलही आहेत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनीही भारताकडून क्रिकेट खेळले असले तरी त्यांना फारसे यश मिळाले नाही. टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या मुलाने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. २०११ च्या विश्वचषकात युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या ६६ वर्षीय योगराज सिंग आपली क्रिकेट अकादमी चालवत आहेत आणि युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत आहेत. त्याच्या कोचिंगचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यामध्ये ते कडक प्रशिक्षक म्हणून दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगराज सिंग हे एक शिस्तबद्ध कोच आहेत, याचसह ते आपला कडक स्वभाव आणि कठोर प्रशिक्षणासाठी ओळखले जातात. यादरम्यान योगराज सिंग यांना एका मुलाखतीत एक प्रश्न विचारला गेला की तुमच्या अकॅडमीत प्रवेश घ्यायचा असेल तर त्या मुलांनी नेमकी काय मानसिकता ठेवायला हवी? यावर उत्तर देताना योगराज सिंह यांनी एक धक्कादायक किस्सा सांगत उत्तर दिले. आपल्या प्रशिक्षणाबरोबरचं योगराज सिंह हे त्यांच्या विचित्र वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात.

हेही वाचा – Tilak Verma Century: तिलक वर्माच्या शतकाचं आवेश खानने केलं सॅमी स्टाईल सेलिब्रेशन, सूर्यकुमार यादव पोस्ट करत म्हणाला “बेस्ट बर्थडे गिफ्ट…”

स्विचला मुलाखत देताना योगराज सिंह म्हणाले, सर्वात आधी तर मृत्यूची भिती संपायला हवी. जेव्हा मी तीन वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी आईला मला वाघाच्या शिकारीसाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं. माझी आई घाबरली होती. त्यावर माझे वडील म्हणाले होते, तो मेला तरी काही फरक पडणार नाही. पण मी त्याला वाघ बनवेन’.

हेही वाचा – IND vs PAK Hockey: भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय अन् सेमीफायनलमध्ये मारली धडक, कर्णधार हरमनप्रीत सिंहचे दोन दणदणीत गोल

योगराज सिंह यांनी त्यांच्या लहानपणीचा किस्सा सांगत पुढे म्हणाले, “तो तीन वर्षांचा मुलगा आपल्या आईसह कालाढुंगी (नैनिताल जिल्हा) जंगलात बसला होता. वडील हातात रायफल घेऊन चंद्राच्या प्रकाशात उभे होते. आम्ही मचानवर बसलो होतो. त्याचवेळी तिथे वाघ आला, मी ओरडणार होतो पण तितक्यात आईने तोंड दाबलं. तितक्यात माझ्या वडिलांनी सहा फुटावरुन वाघाची शिकार केली. डोक्यात गोळी घालून त्यांनी वाघाला ठार केलं. एखाद्या पर्वताप्रमाणे असलेला तो वाघ खाली कोसळला”.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटचे पीटी उषा यांच्यावरील आरोप खोटे? वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

पुढे म्हणाले, “तो लहान मुलगा त्या क्षणी निशब्द होता. माझ्या वडिलांनी आईला मला खाली आणायला सांगितले. मला पकडून ते म्हणाले, वाघाचा बछडा कधी गवत खात नाही. तो आवाज माझ्या कानात घुमू लागला होता. यानंतर त्यांनी मला वाघावर बसवलं आणि त्याचं रक्त माझ्या ओठांवर आणि कपाळावर लावलं. माझ्या घरात अजूनही तो फोटो आहे. मी युवराजला तसंच भितीमुक्त घडवलं आहे”, असंही ते म्हणाले. योगराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yograj singh shares incident of his father said my father killed a tiger smeared its blood on my lips and forehead bdg