बॉम्बे जिमखाना आयोजित राज्य स्क्वॉश कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत १९ वर्षांखाली मुलांच्या गटात योहान पांडोलेने तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात आकांक्षा साळुंखेने जेतेपदावर नाव कोरले. १९ वर्षांखालील गटात योहान पांडोलेने ऐश्वर्य सिंगवर ११-८, १३-११, ११-९ असा विजय मिळवला. १७ वर्षांखालील गटात आर्यमान आदिकने अभय सिंगवर ८-११, ११-७, ७-११, ११-४, ११-७ अशी मात केली. १५ वर्षांखालील गटात चैतन्य शाहने तुषार शाहनीला ११-८, ११-६, ११-५ असे नमवले. १३ वर्षांखालील गटात यश फातडेने नील जोशीचा ११-९, ११-५, ११-५ असा पराभव केला. ११ वर्षांखालील गटात आकाश गुप्ताने जेह पांडोलेवर ११-७, ११-७, ११-९ असा विजय मिळवला. ९ वर्षांखालील गटात विवान शाहने युवराज वाधवानीवर ११-५, ११-४, ९-११, ६-११, ११-७ अशी मात केली. १७ वर्षांखालील मुलींमध्ये आकांक्षा साळुंखेने ऐश्वर्या सिंगला ११-७, ११-६, ११-७ असे नमवले. १५ वर्षांखालील गटात दिया जौकुनीने आकांक्षा रावचा ११-७, ११-७, ११-६ असा पराभव केला. १३ वर्षांखालील गटात मेघा भाटियाने तर ११ वर्षांखालील गटात ऐश्वर्या खुबचंदानीने जेतेपदाची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा