Gautam Gambhir statement on Sanju Samson : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलच्या चालू हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्याने आपल्या फलंदाजीनेच नव्हे तर कर्णधारपदानेही सर्वांची मने जिंकली. या कामगिरीच्या जोरावर सॅमसनने टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात आपले स्थान निश्चित केले. ऋषभ पंतनंतर दुसरा यष्टिरक्षक म्हणून सॅमसनचा समावेश करण्यात आला. आता माजी भारतीय फलंदाज आणि केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरने संजू सॅमसनला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याने सांगितले की आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ ५ जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. जिथे त्याचा सामना आयर्लंडशी होणार आहे. त्यामुळे संजू सॅमसन केवळ टी-२० विश्वचषकात सहभागी होणार नाही, तर भारताच्या विजयातही योगदान देईल, असा विश्वास माजी खेळाडू गौतम गंभीरला आहे. गंभीरच्या मते, सॅमसनकडे खूप अनुभव आहे. त्याने आता या अनुभवाचा वापर अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी त्याच्या पूर्ण क्षमतेने केला पाहिजे.

संजूमध्ये क्षमता आहे आणि त्याला संधीही आहे –

संजू सॅमसनबद्दल बोलताना गौतम गंभीरने स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “संजूमध्ये क्षमता आहे आणि आता त्याला संधी आहे. जर त्याला टी-२० विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली, तर त्याला टीम इंडियाला सामने जिंकवावे लागतील. तो आता नवखा नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता त्याला टी-२० विश्वचषक खेळण्याची संधी आहे.”

हेही वाचा – SRH vs GT : सामना आटोपल्यानंतर काव्या मारनने घेतली केन विल्यमसनची गळाभेट, VIDEO होतोय व्हायरल

सॅमसनला टी-२० विश्वचषकात संधी मिळाल्यास त्याच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा त्याच्या फलंदाजीवर सकारात्मक परिणाम होईल, असे गंभीरचे म्हणणे आहे. गंभीर म्हणाला की, मला कोणत्याही प्रतिभावान क्रिकेटपटूबद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. खेळाडू कसा आहे हे जाणून घेण्यासाठी पाच मिनिटे पुरेशी आहेत. मानसिकदृष्ट्या तुम्ही नेहमी स्वतःचा आणि तुमच्या कलागुणांचाही विकास करावा.

हेही वाचा – VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय

तुम्ही हे न केल्यास, तुम्ही जास्त काळ परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणार नाही. फिटनेस, पॉवर हिटिंग, विकेटकीपिंग किंवा कर्णधारपद, ही चांगली गोष्ट आहे आणि त्याने चुकीच्या ठिकाणी पाऊल ठेवलेले नाही. कर्णधारपदामुळे तुम्ही अभ्यास करू शकता आणि स्वतःला चांगले ओळखू शकता. यामुळे तुम्हाला चांगला फलंदाज बनण्यास मदत होते. सॅमसनला संधी मिळाल्यास त्याच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा फलंदाजीवर सकारात्मक परिणाम होईल अशी मला आशा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You are not a newbie gautam gambhir asks sanju samson to show the world what you are in t20 world cup 2024 vbm